INDW vs AUSW : महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; भारतानं ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं

भारताने महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा केला पराभव
INDW vs AUSW
INDW vs AUSWesakal
Updated on

India women Vs Australia Women Test Match : भारतीय महिला क्रिकेट संघाने आज इतिहास रचला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलियासोबतच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सनी पराभूत केलं. भारताचा हा ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघावरील कसोटी क्रिकेटमधील पहिला वहिला विजय आहे.

चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 74 धावांची गरज होती. हे माफक आव्हान भारताने 2 विकेट्सच्या बोदल्यात पार केलं. भारताच्या दुसऱ्या डावात स्मृती मानधनाने 38 धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 तर दुसऱ्या डावात 261 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या.

INDW vs AUSW
Gautam Gambhir : ...तर बीसीसीआयचा 'तो' सर्वात खराब निर्णय ठरला असता; गौतम गंभीर कशाबद्दल बोलतोय?

भारताने बलाढ्य इंग्लंडला कसोटी सामन्यात पराभूत केल्यानंतर त्यांचा मुकाबला महिला क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करत 219 धावा केल्या.

भारताकडून पूजा वस्त्रकार आणि स्नेह राणा यांनी भेदक मारा केला. पूजाने 4 विकेट्स घेतल्या तर स्नेह राणाने 3 विकेट्स घेतल्या. या दोघींना दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅग्राथने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या.

भारताने प्रत्युत्तरात खेळताना आपल्या पहिल्या डावात दमदार बॅटिंग करत 406 धावा ठोकल्या. भारताकडून तब्बल चार बॅटर्सनी अर्धशतकी खेळी केली. मात्र एकाही बॅटरला शतकी मजल मारता आली नाही. सलामीवीर स्मृती मानधनाने 106 चेंडूत 74 धावा तर दिप्ती शर्माने 171 चेंडूत 78 धावा ठोकल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने 73 धावांची खेळी केली.

INDW vs AUSW
Hardik Pandya : पांड्या IPL ला मुकणार ही अफवा; अफगाणिस्तानविरूद्ध करणार भारतीय संघाचं नेतृत्व?

भारताकडून रिचा घोषने 52, शेफाली वर्माने 40 तर पूजा वस्त्रकारने 47 धावांचे योगदान दिले. भारताने पहिल्या डावात 187 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डावात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र कांगारूंनी 4 बाद 206 धावा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केलं. स्नेह राणाने 4 तर राजेश्वरी गायकवाड आणि कर्णधार हरमनप्रीतने प्रत्येकी 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 261 धावात संपवला. ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅग्राथने सर्वाधिक 73 तर एलिसा पेरीने 43 धावांची खेळी केली.

भारताने ऑस्ट्रेलियाला 261 धावात गुंडाळल्यानंतर विजयासाठी 74 धावांचे माफक आव्हान मिळाले होते. चौथ्या दिवशी भारतीय संघाने हे आव्हान 2 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. स्मृती मानधना आणि रिचा घोषने दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. स्मृतीने नाबाद 38 धावा केल्या तिने चौकार मारत सामना संपवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.