VIDEO: स्मृतीचा पहिला हल्ला फसला, दुसऱ्या वेळी मात्र...

Smriti Mandhana Sixer Video Gone Viral
Smriti Mandhana Sixer Video Gone Viral esakal
Updated on

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध (India Women vs Pakistan Women) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) धडाकेबाज फलंदाज शेफाली बाद झाल्यानंतर सावध सुरूवात केली. स्मृतीने दिप्ती शर्माला (Deepti Sharma) साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. दरम्यान, स्मृतीने सेट झाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर सध्या स्मृती मानधनाच्या याच आक्रमक अवताराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Smriti Mandhana Sixer Video Gone Viral
आई कुठे काय करते? पाक कॅप्टन लेकीला कडेवर घेऊन आली मॅच खेळायला

सावध सुरूवात करणाऱ्या स्मृती मानधनाने सामन्याच्या 10 व्या षटकात भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. भारताच्या फक्त 25 धावा झाल्या असल्याने स्मृतीने पाकिस्तानच्या ऑफ स्पिनरला मोठे फटके मारण्याची जोखीम उचलली. तिने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पुढे सरतावत षटकार खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ जाऊन चेंडून थांबला त्यामुळे स्मृतीला षटकार (Smriti Mandhana Sixer) सोडाच चौकार देखील मिळाला नाही. मात्र स्मृती मानधनाने याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका मारला. अखेर हा चेंडू थेट सीमापार गेला आणि स्मृतीला षटकार मिळाला.

Smriti Mandhana Sixer Video Gone Viral
INDW vs PAKW : स्नेह - पूजा जोडीने पाकला झोडपले; सोपा सामना झाला अवघड

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने सावध सुरूवातीनंतर 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिने दिप्ती शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केला. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे भारताची अवस्था 1 बाद 96 वरून 6 बाद 114 अशी झाली. अखेर स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला 200 चा टप्पा पार करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.