VIDEO: वर्ल्ड कपपूर्वी स्मृतीची स्माईल अन् हरमनप्रीतचा भांगडा झाला व्हायरल

Smriti Mandhana Smile Harmanpreet Bhangra Video Gone Viral
Smriti Mandhana Smile Harmanpreet Bhangra Video Gone Viral esakal
Updated on

न्यूझीलंडमध्ये येत्या 4 मार्चपासून वनडे महिला आयसीसी वर्ल्डकप (ICC Womens World Cup) सुरू होत आहे. यासाठी सर्वच संघ जय्यत तयारी करत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाचा (Indian Womens Cricket Team) पहिला सामना 6 मार्च रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर (India vs Pakistan) होणार आहे. दरम्यान भारतीय संघाने वर्ल्डकपसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटदरम्यान, भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) चांगलीच दंगामस्ती केली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

स्मृती मानधना आणि हरमनप्रीतचा हा फोटोशूट दरम्यानचा व्हिडिओ आयसीसीने देखील शेअर केला आहे. या व्हिडिओतील स्मृतीची स्माईल (Smriti Smile) आणि हरमनप्रीत कौरचा भांगडा (Harmanpreet Bhangra) विशेष लक्ष वेधून घेत आहे. हरमन व्हिडिओदरम्यान म्हणते की मला फक्त एवढेच करायला येते. यानंतर स्मृतीने स्माईल केली तर इतर खेळाडू फोटोशूट करण्यात व्यग्र होते. या व्हिडिओला आयसीसीने (ICC) 'जबरदस्त डान्स लाफ्टरचा डोस! या संघात वर्ल्डकपपूर्वी आलयं आनंदाचे भरते' असे कॅप्शन दिले आहे.

Smriti Mandhana Smile Harmanpreet Bhangra Video Gone Viral
श्रीसंतने विंडीजच्या फलंदाजाला गंडवल्याचा केला खुलासा

हरमनप्रीत कौर ही भारतीय क्रिकेट महिला संघाची उपकर्णधार आहे. ती न्यूझीलंड विरूद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या बॅडपॅचमधून बाहेर आली. तिने सराव सामन्यात देखील शतक ठोकून आपल्या टीकाकारांचे तोंड बंद केले. सलामीवीर स्मृतीने देखील वर्ल्डकपला सामोरे जाण्यापूर्वी आपल्या बॅटची धार तपासून पाहिली.

Smriti Mandhana Smile Harmanpreet Bhangra Video Gone Viral
कॅप्टन होताच रोहितने काढली Lamborghini Urus; रंगाचे आहे खास कनेक्शन

भारताने 2017 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना इंग्लंडकडून 9 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यावेळी भारताच्या हातून थोडक्यात वर्ल्डकप निसटला. त्यानंतर भारतीय संघ आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभूत झाला होता. भारताची अनुभवी फलंदाज आणि कर्णधार मिताली राजचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. यानंतर मिताली राज (Mithali Raj) आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) देखील निवृत्त होणार आहेत. भारतीय संघ या दोघांनी वर्ल्डकप विजेता संघ होऊन निरोप देण्याचा जोरदार प्रयत्न करेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.