IND vs AUS women 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघ सध्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियासोबत दुसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. या मॅचमध्ये भारतीय स्टार क्रिकेटर स्नेह राणाला जबर दुखापत झाली, त्यानंतर तिला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
आणि हरलीन देओलला मैदानात पाठवण्यात आले. स्नेहने मैदान सोडल्यानंतर काही वेळातच बीसीसीआयने एक अपडेट जारी करत ही माहिती दिली.
ऑस्ट्रेलियन डावातील 25 व्या षटकात ही घटना घडली. ऑस्ट्रेलियन बेथ मुनीने हवेत मोठा शॉट खेळला आणि पूजा वस्त्राकर राणासोबत झेल घेण्यासाठी धावली. झेल घेण्याच्या प्रयत्नात दोघींची धडक झाली. त्यात राणा गंभीर जखमी झाली. फिजिओ मैदानात आले आणि तिला घेऊन बाहेर गेले.
मात्र, 33व्या षटकात राणा पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात आली. राणाने 10 षटके टाकली आणि 59 धावांत एक विकेट घेतली. पण आता ती फलंदाजीला येणार नाही. तिच्या जागी हरलीनला संधी मिळणार आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून 258 धावा केल्या. त्यासाठी फोबी लिचफिल्डने 63 धावांची खेळी केली. तिच्याशिवाय एलिसा पेरीने 47 चेंडूत 50 धावा केल्या. संघाला अडीचशेच्या पुढे नेण्यात खालच्या फळीने महत्त्वाची भूमिका बजावली.
अॅनाबेल सदरलँडने 23, जॉर्जिया वेअरहॅमने 22 आणि एलाना किंगने नाबाद 28 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने पाच विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकर, पाटील आणि राणा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.