गांगुली, शहा यांना मुदतवाढ?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

सौरभ गांगुली व जय शहा यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा व सचिवपदाचा कार्यकाळ वाढणार की नाही
sourav ganguly and jay shah
sourav ganguly and jay shahesakal
Updated on

मुंबई : सौरभ गांगुली व जय शहा (sourav ganguly and jay shah) यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा व सचिवपदाचा कार्यकाळ वाढणार की नाही, याचे उत्तर मिळालेले नाही. ‘बीसीसीआय’कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार होती. पण ती आता गुरुवारी होणार आहे. याचिकेत ‘बीसीसीआय’च्या संविधानातील इतर दुरुस्त्यांमधील बदलांचाही समावेश होता.

sourav ganguly and jay shah
SL vs PAK : पाकिस्तानचा अब्दुल्ला सुनिल गावसकर क्लबमध्ये सामिल

गांगुली यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ऑक्टोबर २०१९मध्ये ‘बीसीसीआय’चा कार्यभार स्वीकारला होता. ‘बीसीसीआय’ने न्यायालयाला आपल्या नवीन घटनेतील नियम सुधारित करण्याची विनंती केली, ज्यामध्ये प्रशासकांना ‘बीसीसीआय’ किंवा कोणत्याही राज्य संघटनेत सलग सहा वर्षानंतर तीन वर्षांचा ‘कूलिंग ऑफ कालावधी’ पार करावा लागतो.

न्यायालयाने ‘बीसीसीआय’ किंवा राज्य संघटनांच्या निवडणुका लढवण्यापूर्वी क्रिकेट प्रशासकांना ‘‘कूलिंग-ऑफ कालावधी’’ मधून जावे या शिफारशीचे समर्थन केले होते.

sourav ganguly and jay shah
Magnus Carlsen : आव्हानात्मक नाही! मॅग्नसची चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार

असा बदल व्हायला हवा

बीसीसीआयला ‘‘कूलिंग-ऑफ कालावधी’’ या नियमामध्ये बदल हवा आहे. एखाद्या व्यक्तीने तीन वर्षे राज्य संघटनेत काम केले, तर ती वर्षे यासाठी ग्राह्य धरायला नको. बीसीसीआयच्या कार्यकारिणीतील वर्षे ‘‘कूलिंग-ऑफ कालावधी’’साठी ग्राह्य धरायला हवीत, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.