World Cup 2023 : विराट - रोहितची कारकीर्द संपणार... सौरव गांगुलीने केले मोठे वक्तव्य

Sourav Ganguly World Cup 2023
Sourav Ganguly World Cup 2023esakal
Updated on

Sourav Ganguly World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक बीसीसीआयने नुकतेच जाहीर केले. वर्ल्डकप मायदेशात होणार असल्याने भारताला चांगली संधी आहे. त्यामुळे भारतीय संघाचे कॉम्बिनेशन पासून महत्वाचे खेळाडू याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एक मोठ वक्तव्य करत खळबळ उडवली आहे.

Sourav Ganguly World Cup 2023
धनश्री-श्रेयस अय्यरची स्टोरी अन् चर्चांना उधाण! काय आहे व्हायरल फोटो मागचे रहस्य?

सौरव गांगुलीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वयावरून एक वक्तव्य केले. गेल्या एक दशकापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय फलंदाजीचे नेतृत्व करत आहेत. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्माचे वनडेमधील शेवटचे दिवस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. या परिस्थितीत गांगुलीने केलेले वक्तव्य खूप महत्वाचे आहे.

सौरव गांगुली म्हणाला की, 'मी गेल्या वेळी, पहिल्यांदाच अशा गोष्टीवर जास्त विश्वास ठवेत नाही. मी कामगिरीवर विश्वास ठेवतो. मला असं वाटतं की ते 34 - 35 वर्षाचे आहेत. मला माहिती नाही की पुढच्या वर्ल्डकपमध्ये काय होणार. प्रत्येक वर्षी जागतिक स्पर्धा होत आहे. टी 20, वनडे क्रिकेट. आम्ही खेळत होतो त्यावेळी असं नव्हतं प्रत्येक चार वर्षांनी वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला मिळत होते.

Sourav Ganguly World Cup 2023
Punjab Vs BCCI : पंजाबसोबत राजकारण झालं! कोहलीच्या 100 व्या सामन्याचा उल्लेख करत BCCI उपाध्यक्ष म्हणाले...

गांगुली पुढे म्हणाला की, 'प्रदर्शनाच्या दृष्टीने मला खात्री आहे की कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहली हा वर्ल्डकप खूप जिद्दीने खेळतील. व्यक्तिगतरित्या नाही तर वर्ल्डकप जिंकणेच खूप मोठे आहे. मला वाटते की ही मोठं आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()