MS Dhoni : धोनीची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती… दादाचे एक बलिदान अन् घडला इतिहास

MS Dhoni
MS Dhoni
Updated on

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट विश्वातील यशस्वी नाव आहे. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची ओळख आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ साली पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर धोनी भारतीय संघाला २०११ मध्ये ५० षटकांचा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली.

टीम इंडियाचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव होते, ज्यांनी १९८३ मध्ये भारताला ICC चे विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर धोनीने हे यश भारताला मिळवून दिले. त्यामुळे क्रिकेट विश्वात जेव्हा भारताच्या दिग्गज कर्णधारांचा विचार केला जातो तेव्हा महेंद्रसिंग धोनीचे नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येते.

मात्र धोनीच्या यशामागे अनेक दिग्गजांचे हात आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला दादा सौरव गांगूली.  सौरव गांगूलीच्या नेतृत्वात भारताला २००३ मध्ये विश्वचषक जिंकण्याची संधी होती. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला आहे. मात्र यावेळी गांगुलीच्या कर्णधार पदाची जोरात चर्चा झाली होती. 

धोनी जरी यशस्वी कर्णधार असला तरी त्याला लॉन्च करून त्याच्या करिअरला दिशा देण्याचे काम सौरव गांगुलीने केले. धोनीने डिसेंबर २००३ मध्ये बांगलादेश दौऱ्यात पदार्पण केले. धोनीने आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवला होता. मात्र तो ७ नंबरवर खेळायला येत असल्याने त्यांना जास्त संधी मिळत नव्हती. यावेळी गांगुलीने ओळखले होती की धोनी लंबे रेस का घोडा है. मात्र जरी त्याला संधी मिळाली नाही तर तो नष्ट होईल. 

MS Dhoni
PSL Video Erin Holland : पाकिस्तानात हे चाललंय काय; महिला समालोचकाला उचलून थेट घेतलं कडेवर अन्...

२००५ मध्ये गागुंगली फ्लॉप जात होता. त्याच्या फलंदाजीतून धावा निघत नव्हत्या. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग त्यावेळी ओपनिंग करत होते तर गागुंली ३ नंबरवर खेळत होता. खराब कामगिरीमुळे सौरव गांगुलीला सर्वत्र टीकेला सामोरे जावे लागले. पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता आणि इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखालील संघ कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला.

कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामना होता. एकदिवसीय सामन्यात देखील धोनी ७ नंबरवर फलंजादी करायचा. त्यामुळे त्याची कारकीर्द संपत होती. फक्त विकेटकिपींग त्याचे करीअर नव्हते. सौरव गांगुलीने देखील एका मुलाखतीत सांगितले होते की विकेटकिपींग धोनीचे ताकद नाही. तो लांब छक्के चांगल्याप्रकारे मारतो. तो ७ नंबरवर खेळत राहीला तर खतम होईल. 

MS Dhoni
AB de Villiers : एबी डिव्हिलियर्सने तोडले विराटचे ह्रदय; टी 20 इतिहासातील ग्रेटेस्ट खेळाडू म्हणून घेतलं दुसऱ्याचंच नाव

एकदिवसीय सामन्याची पहिला सामना कोची येथे खेळला गेला. यावेळी गांगुली नंबर तीन वर आला मात्र त्याला धावा करता आल्या नाहीत. तो शुन्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्यावर खूप टीका झाली. यानंतर दादाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीला संधी दिली. धोनी नंबर ३ वर फलंदाजी करायला आले. यानंतर धोनीने मागे वळून पाहिले नाही. या सामन्यात धोनीने १५ चौके आणि ४ छक्के लगावले. त्यांनी १२३ चेंडूत १४८ धावा केल्या. यानंतर गांगुली ४ नंबरवर खेळायला आला. भारताने हा सामना जिंकला. 

तिसऱ्या सामन्यात धोनी नंबर ३ वर खेळायला आला. या सामन्यात त्याने २८ धावा काढले. चौथ्या सामन्यात ४७ धावा काढल्या. पुढच्या दोन सामन्यात देखील तो याच क्रमावर खेळला. यानंतर गांगुलीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यानंतर द्रविडने कर्णधार म्हणून काम केले. गांगुली परत आल्यावर धोनीला परत खाली खेळावे लागले. मात्र तोपर्यंत सर्वांनी त्याची क्षमता ओळखली होती. 

MS Dhoni
IND vs AUS : इंदूर कसोटीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या क्रीडा पत्रकाराचा हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.