Sourav Ganguly Virat Kohli Test Captaincy : भारताचा संघ WTC Final मध्ये सलग दुसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर संघाच्या कामगिरीबाबत, वरिष्ठ खेळाडूंबाबत माजी खेळाडू आणि क्रिकेट समीक्षक चिरफाड करताना दिसत आहेत. आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात सार्वजनिकरित्या वाद झाल्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी विराटने टी 20 चे नेतृत्व सोडले होते. तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आता बीसीसीआय विराट कोहलीच्या कसोटी कर्णधार पदाच्या राजीनाम्यासाठी तयार नव्हती असा गौप्यस्फोट केला.
आज तकशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, 'विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडले त्यावेळी बीसीसीआय या निर्णयासाठी तयार नव्हते. दक्षिण आफ्रिकेनंतर आलेला हा राजीनामा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.'
'विराट कोहलीच सांगू शकतो की त्याने हा राजीनामा का दिला. याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. कारण विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं आहे. निवडसमितीला भारतीय संघासाठी कर्णधार नियुक्त करणे गरजेचे होते. त्यावेळी रोहित शर्मा हा सर्वात चांगला पर्याय होता.'
ऑस्ट्रेलियाविरूद्धची WTC Final हरल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाविषयी बोललं जात आहे. मात्र गांगुलीने रोहितला पाठिंबा देत म्हटलं की 5 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणे हा काही विनोद नाही.
गांगुली म्हणाला की, 'त्यावेळी रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय होता. त्याने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली होती. त्याला आशिया कप सारख्या स्पर्धेत जेव्हा जेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती त्याने विजय मिळवला होता. तो योग्य पर्याय होता. त्याने याहीवेळी भारतीय संघाला WTC Final मध्ये पोहचवले.
रोहितकडे आता आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ही शेवटची संधी असणार आहे. भारताने गेल्या 10 वर्षात आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही.
याबाबत सौरव गांगुली म्हणाला की, 'मला वाटते की रोहितने कोणतीही भिती न बाळगता संघाचे नेतृत्व करावे. सहा महिन्यात आपल्याला वर्ल्डकप खेळायचा आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, बुमराह (आपल्याला माहिती नाही की तो तेव्हापर्यंत फिट होणार की नाही.) मोहम्मद शमी, सिराज हा संघ जिंकू शकतो.'
'राहुल द्रविडसोबत मी मी खेळलो आहे. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. माझ्या मते तो फक्त रोहित सोबतच हा संघ घेऊन पुढे जाऊ शकतो.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.