नवी दिल्ली : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुली हा भारताचा एक महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी मॅच फिक्सिंगमुळे भारतीय क्रिकेट हादरून गेले होते. त्यावेळी सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) कर्णधार पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देत क्रिकेट चाहत्यांचा विश्वास पुन्हा जिंकला. (Sourav Ganguly Latest News)
मात्र अशा या सौरभ गांगुलीला 2005 मध्ये भारतीय संघातून डच्चू मिळाला होता. तो अंत्यत खराब कामगिरी करत होता असे नाही मात्र त्याचे आणि नव्याने नियुक्ती झालेले प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याशी मतभेद झाले होते. त्यामुळे गांगुली जवळपास सहा महिने संघाबाहेर होता. याबाबत त्याने द टेलिग्राफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने देशांतर्गत क्रिकेट (Cricket) खेळतानाच्या अनुभवाबाबत प्रतिक्रिया दिली होती.
तो म्हणाला की, 'देशांतर्गत क्रिकेट खेळणे कठिण होते असं मी म्हणणार नाही. मात्र तेव्हाची परिस्थिती कठिण होती. कारण काही गोष्टी माझ्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या देखील बाहेर होत्या. त्यावर माझे नियंत्रण नव्हते. मी भारतासाठी कोणताही ब्रेक (Break) न घेता सलग 13 वर्षे खेळलो होतो. मी कोणतीही गोष्ट चुकवली नव्हती. मालिका नाही की टूर नाही. मी आताचे अनेक खेळाडू जशी विश्रांती घेतात तशी कोणतीही विश्रांती घेतली नव्हती. त्यामुळे मी माझ्या 17 वर्षाच्या कारकिर्दितले ते चार - सहा महिने ब्रेक म्हणूनच समजतो.'
गांगुली म्हणाला की त्याला राग आणि नैराश्य दोन्ही आले होते. मात्र तरीही तो खचला नाही. त्याने त्याचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला. तो झोपेच्या गोळ्या घेत असल्याची अफवा देखील पसरली होती. याबाबत बोलताना गांगुली म्हणाला की, नाही हे खरं नाही आहे. मात्र मला राग येत होता आणि नैराश्य देखील येत होतं. मात्र मी दुप्पट मेहनत केली. मला स्वतःला सिद्ध करायाचं होतं. मला माहिती होतं की माझ्यामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक होते. मी स्वतःलाच समजावत होतो की कोणत्याही परिस्थितीत मला स्वतःला सिद्ध करायचेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.