द्रविड टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या संघाची इंग्लंडमध्ये दाखवेल झलक : गांगुली

Sourav Ganguly Says Rahul Dravid May Give Indication About T20 World Cup Indian Squad
Sourav Ganguly Says Rahul Dravid May Give Indication About T20 World Cup Indian Squadesakal
Updated on

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काम्बिनेशन काय असेल याबाबत महत्वाची माहिती दिली. सौरभ गांगुली म्हणाला की, भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघ व्यवस्थापन इंग्लंड विरूद्धच्या टी 20 मालिकेत ज्या खेळाडूंना संधी देतील ते ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघात खेळण्याची शक्यता असेल. (Sourav Ganguly Says Rahul Dravid May Give Indication About T20 World Cup Indian Squad)

Sourav Ganguly Says Rahul Dravid May Give Indication About T20 World Cup Indian Squad
भारतात होणाऱ्या चेस ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच मशाल प्रज्वलन : ठाकूर

सध्या टीम इंडियाच्या टी 20 संघात संघात मोठ्याप्रमाणावर प्रयोग केले जात आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली नवोदितांचा संघ खेळत आहे. तसेच आयर्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारताचा नवखा संघ खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये संघाची रचना आणि प्रमुख खेळाडूंशिवाय कोणते खेळाडू संघात स्थान मिळवू शकतात याची चाचपणी सुरू आहे.

सौरभ गांगुलीला ज्यावेळी विचारण्यात आले की आयसीसीची मोठी स्पर्धा होणाऱ्या वर्षात खेळाडूंना रोटेट करणे योग्य पर्याय आहे का? यावर गांगुलीने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, 'राहुल द्रविड या गोष्टीवर नजर ठेवून आहे. तो एका मालिकेत संघात स्थान असलेल्या खेळाडूंना घेऊन खेळण्याची योजना आखत आहे. कदाचित पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यातील टी 20 मालिकेत टीम इंडिया संघातील प्रमुख खेळाडूंबरोबर खेळण्यास सुरूवात करेल. या संघात ज्या खेळाडूंची ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता आहे त्या खेळाडूंचा समावेश असेल.'

Sourav Ganguly Says Rahul Dravid May Give Indication About T20 World Cup Indian Squad
PCB ने राष्ट्रीय कोचला केले निलंबित; महिला क्रिकेटपटूचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळणाऱ्या युवा खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी करून दाखवली आहे. भारताने 2 - 0 अशी पिछाडीवरून मालिकेत जोरदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकत मालिका बरोबरीत आणली. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना बंगळुरू येथे रविवारी खेळवला जाणार आहे. या सामना मालिकेचा विजेता ठरवले. यानंतर भारत आयर्लंड विरूद्ध दोन टी 20 आणि इंग्लंड दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.