Sourav Ganguly : टीम इंडियाला थंड जेवण; BCCI चा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणतो...

Sourav Ganguly Statement About Team India Served Sandwich Cold Meal In Australia
Sourav Ganguly Statement About Team India Served Sandwich Cold Meal In Australia Esakal
Updated on

Sourav Ganguly : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँड सामन्यापूर्वी एक वाईट अनुभव आला. सिडनीत सराव झाल्यानंतर दमलेल्या टीम इंडियाला थंड जेवण आणि सँडविचव देण्यात आले. यावरून भारतीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. याबाबत भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा होत असतानाच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरभ गांगुलीने देखील याबाबत वक्तव्य केले आहे.

Sourav Ganguly Statement About Team India Served Sandwich Cold Meal In Australia
IND Vs NED : विराट, रोहित अन् सूर्याची अर्धशतके; राहुल नेदरलँडविरूद्धही फेल

सौरभ गांगुली कोलकाता येथील कोलकाता स्पोर्ट्स जर्नालिस्ट क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होता. त्यावेळी सौरभ गांगुलीने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात थंड जेवण देण्याबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला की, 'मला विश्वास आहे की बीसीसीआय हा विषय चांगल्या प्रकारे सोडवेल.' दरम्यान, यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला. याबाबत देखील सौरभ गांगुलीने वक्तव्य केले. तो म्हणाला की, सामन्याचा हा खरा निकाल नाहीये. मला खात्री आहे की इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले असते. पाऊस पडला त्याला कोणी काही करू शकत नाही.'

Sourav Ganguly Statement About Team India Served Sandwich Cold Meal In Australia
T20 World Cup : बांगलादेशचे अव्वल स्थानही गेले अन् रनरेटही झाले 'निगेटिव्ह'

सौरभ गांगुलीने CSJC मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या सौरभ घोषाल आणि अचिता शेउली यांचा गौरव केला. याचबरोबर इतर खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील गांगुलीने सत्कार केला. यावेळी बोलताना सौरभ गांगुली म्हणाला, 'पुरस्कार हे खेळाडूच्या वर्षभराच्या कष्टाचे फळ असते. माझ्या देखील लहान असताना CSJC वार्षिक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरच्या आठवणी ताज्या झाल्या.' गांगुलीला देखील CSJC चा सर्वोकृष्ट क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.