Asia Cup 2023 : 'यापेक्षा चांगला पेस अटॅक...' BCCIचे माजी अध्यक्ष गांगुली यांनी टीम इंडियाबाबत केलं मोठं वक्तव्य

Asia Cup 2023
Asia Cup 2023
Updated on

Asia Cup 2023 : आशिया कप सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. याआधी सोमवारी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. त्याचबरोबर संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे.

संघात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले, त्यात युझवेंद्र चहलला वगळण्यात आले तर तिलक वर्माचा संघात समावेश करण्यात आला. आता या संघाबाबत माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. रवी शास्त्री, सुनील गावसकर यांच्यानंतर आता सौरव गांगुलीने टीम इंडियाबाबत वक्तव्य केलं आहे.

Asia Cup 2023
Asia Cup 2023 : संघात निवड झालेल्या खेळाडूला सोडून टीम आशिया कपसाठी रवाना! काय आहे कारण?

आशिया कपसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी काहींनी सहा महिने तर काहींनी वर्षभर एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही, मात्र हा संघ केवळ आशिया कपच नाही तर विश्वचषकही जिंकू शकेल, असे गांगुलीला वाटते. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून त्यामुळे संघाची मधली फळी मजबूत झाली आहे.

Asia Cup 2023
Heath Streak : मी जिवंत...!, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी खोटी, जाणून घ्या प्रकरण

माजी कर्णधार गांगुली म्हणाला, "हा खूप मजबूत संघ आहे. बुमराह परतला आहे, ज्यामुळे संघ आणखी मजबूत झाला आहे. शमी, बुमराह, सिराजमुळे पेस अटॅक खूप चांगला झाला आहे. तुम्हाला यापेक्षा चांगला पेस अटॅक मिळू शकत नाही. स्पिनमध्ये, जडेजा एक मनगटाचा फिरकी गोलंदाज असेल आणि तो फलंदाजी देखील करेल. भारत एक मजबूत संघ आहे, त्यांना फक्त आशिया कप आणि विश्वचषक दरम्यान चांगले आणि आत्मविश्वासपूर्ण क्रिकेट खेळण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.