कोलकाता: गृहमंत्री अमित शाह यांनी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरी जेवल्यानंतर, त्यांची पत्नी डोना गांगुली राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या राज्यसभेच्या सदस्य होऊ शकतात, अशी चर्चां सुरु आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी सोमवारी आपल्या वक्तव्यात डोना गांगुलीचे नाव घेऊन या चर्चांना आणखी खतपाणी घातले आहे. राष्ट्रपती विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करतात. त्यांनी पश्चिम बंगालमधूनही कोणाला उमेदवारी दिल्यास आम्हाला आनंद होईल, असे दिलीप घोष यांनी पत्रकारांना सांगितले. पश्चिम बंगाल मधुन डोना गांगुलीसारखी व्यक्ती राष्ट्रपतींनी नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर गेल्यास अधिक आनंद होईल.(Sourav Ganguly Wife Dona Go To Rajya Sabha Political Gossip)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी या विषयावर कोणतेही भाष्य केलेले नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून याप्रकरणी माध्यमांशी बोलणे योग्य नाही, असे ते म्हणाले. याप्रकरणी अंतिम निर्णय केंद्रीत घेतला जाईन. मात्र डोना गांगुली राज्यसभेवर गेल्यास आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील राज्यसभा सदस्य आणि अभिनेत्री रूपा गांगुली आणि माजी पत्रकार स्वप्ना दासगुप्ता यांचा कार्यकाळ संपणार आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी 6 मे रोजी सौरव गांगुलीच्या घरी जेवण केले होते. यादरम्यान डोना गांगुली यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याबाबत चर्चा झाली. डोना गांगुलीने त्याच दिवशी व्हिक्टोरिया मेमोरियल मध्ये नृत्यही केले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. त्यानंतर डोना गांगुलीसोबत तिच्या निवासस्थानी डिनरसाठी पोहोचले होते. गेल्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सौरव गांगुलीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकते अशी चर्चा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.