नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) यांच्यातील टी 20 मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीत होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच आयपीएलचा (IPL 2022) महाकुंभमेळा पार पडला. यात दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. आपापल्या भारतीय खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळणारे हे आफ्रिकी खेळाडू आता त्यांच्याविरूद्ध उभे ठाकणार आहेत.
आयपीएलमध्ये खेळणारे डेव्हिड मिलर (David Miller), क्विंटन डिकॉक, एडिन माक्ररम, मार्को जनसेन, कसिगो रबाडा हे प्रमुख दक्षिण आफ्रिकी खेळाडू भारताविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. याचबरोबर काही युवा खेळाडू देखील आयपीएलमध्ये खेळले आहेत. या सर्वांबद्दल कर्णधार टेम्बा बावुमाने (Temba Bavuma) काही वक्तव्य केली आहे. विशेषकरून डेव्हिड मिलरबद्दल त्याने एक कास वक्तव्य केले.
बावुमा म्हणाला की, 'आयपीएलमधला इन फॉर्म डेव्हिड मिलर पाहून आपमचा आत्मविश्वात दुणावला आहे. त्याचा फॉर्म आमच्यासाठी सुखदच आहे. आयपीएलमधल्या त्याच्या कामगिरीमुळे आत्मविश्वासाबरोबरच बहूमूल्य माहिती देखील आमच्या संघाला मिळणार आहे.'
बावुमा डेव्हिड मिलरच्या प्रमोशनबद्दलही बोलला. तो म्हणाला, 'आम्ही डेव्हिड मिलरला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोशन देण्याबाबत देखील चर्चा करतोय. तो जितके जास्त बॉल खेळेल तितका तो धोकादायक बनत जाईल. त्याला त्याची संघातील जागा, त्याची भुमिका माहिती आहे. मात्र ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी त्याला सामन्यातील जास्तीजास्त चेंडू खेळण्याची संधी देण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.'
याचबरोबर टेम्बा बावुमाने इतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. 'आयपीएलमध्ये संघातील काही खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत हे पासून चांगले वाटते. कसिगो रबाडा आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. क्विंटन डिकॉकने देखील आपला क्लास दाखवून दिला आहे. मर्को जेनसेन एडिन माक्ररम आणि इतर युवा खेळाडूंनी देखील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.' बावुमाने या सर्व गोष्टी संघाच्या दृष्टीकोणातून चांगल्या असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.