Sa Vs Ind : भारत-आफ्रिका कसोटी मालिकेनंतर माजी कर्णधार घेणार निवृत्ती! जाणून घ्या का घेतला निर्णय?

South Africa Dean Elgar
South Africa Dean Elgar sakal
Updated on

South Africa Dean Elgar : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे, जिथे त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये सामने खेळायचे आहेत. सर्व प्रथम, दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जात आहे.

ज्यामध्ये पहिला टी-20 सामना डर्बनमध्ये पावसामुळे रद्द करण्यात आला. आता उभय संघांमधला दुसरा सामना 12 डिसेंबरला गेबेरहा येथे होणार आहे. ही टी-20 मालिका झाली की भारतीय संघ वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेपुर्वी मोठी बातमी समोर येत आहे की, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर निवृत्त होऊ शकतो.

South Africa Dean Elgar
Cricket News : 'आता क्रिकेट खेळताना पूर्वीसारखी मज्जा...' दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती

भारताविरुद्धची कसोटी मालिका ही एल्गरची शेवटची मालिका असू शकते. पण 36 वर्षीय एल्गरने निवृत्तीचा निर्णय का घेतला तर प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, कसोटी संघाचे प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याचा समावेश नसल्याचा त्याचा विश्वास आहे.

'रॅपोर्ट न्यूजपेपर'नुसार, एल्गर निवृत्तीचा विचार करत आहे. कारण त्याला वाटते की संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याचा समावेश नाही. अशी विचारसरणी त्याला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर निर्माण झाली असावी. या वर्षाच्या सुरुवातीला एल्गरला कर्णधारपदावरून हटवून टेंबा बावुमाकडे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याचवेळी, त्याच्या निवृत्तीची बातमी लवकरच खंडित होऊ शकते, असे अहवालातील सूत्राने म्हटले आहे.

South Africa Dean Elgar
Pink Ball Test : BCCI ने घेतला मोठा निर्णय; भारतात होणार नाही आता 'पिंक बॉल' टेस्ट, जाणून घ्या कारण?

एल्गरच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिका 'अ' संघाचा कर्णधार टोनी ब्रँडचा वरिष्ठ संघात समावेश केला जाऊ शकतो. अशा स्थितीत भारताविरुद्धच्या मालिकेनंतर एल्गर खरोखरच निवृत्त होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एल्गर प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळतो. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 84 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये त्याने आफ्रिकेसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

आतापर्यंत खेळलेल्या 84 कसोटी सामन्यांच्या 149 डावांमध्ये त्याने 37.28 च्या सरासरीने 5164 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 13 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 धावा आहे. याशिवाय त्याने 8 सामन्यांच्या 7 डावात 104 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.