SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्यांच्या उडवल्या ठिकऱ्या; इंग्लंड गुणतालिकेत आली अफगाणिस्तानच्या पंक्तीत

SA vs ENG
SA vs ENG esakal
Updated on

SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 400 धावांचा पाठलाग करताना गतविजेत्या इंग्लंडचा डाव 170 धावात संपुष्टात आला. आफ्रिकेने 229 धावांचा मोठा विजय मिळवत आपला वर्ल्डकपमधील दबदबा पुन्हा कायम केला. इंग्लंडचा हा वनडे वर्ल्डकपमधील सर्वात मोठा पराभव ठरला. या पराभवाबरोबरच इंग्लंड गुणतालिकेत नवव्या स्थानावर फेकली गेली आहे.

इंग्लंड आणि अफगाणिस्तानने आपल्या 4 सामन्यापैकी फक्त 1 सामना जिंकला असून त्यांचे समान दोन गुण झाले आहेत. मात्र गतविजेत्यांचे नेट रनरेट हे -1.248 आणि अफगाणिस्तानचे -1.250 असल्याने फक्त .002 गुणफरकामुळे ते नवव्या स्थानावर आहेत.

SA vs ENG
SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्यांच्या उडवल्या ठिकऱ्या; इंग्लंड गुणतालिकेत आली अफगाणिस्तानच्या पंक्तीत

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 399 धावा केल्या होत्या. हेन्री क्लासेनने 109 धावांची दमदार शतकी खेळी केली. तर मार्को येनसेनने 75 धावा केल्या. रीझा हेंड्रिक्सने 80 धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत जेराल्ड कोट्झीने 3 तर एन्गिडी आणि येनसेनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून मार्क वूडने 45 तर एटकिनने 35 धावा करत शेवटच्या जोडीसाठी 70 धावांची भागीदारी रचली.

SA vs ENG
Netherlands vs Sri Lanka : रडत खडत का असेना लंकेनं खातं उघडलं; नेदरलँडचं कडव आव्हान लावलं परतवून

दक्षिण आफ्रिकेचे 400 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरूवात काही चांगली झाली नाही. मार्को येनसेन, रबाडा आणि एन्गिडी यांनी इंग्लंडची अवस्था 4 बाद 38 धावाअशी केली. इंग्लंडचे स्टार जॉनी बेअरस्टो (10), डेव्हिड मलान (6), जो रूट () आणि यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना खेळणारा निवृत्तीतून बाहेर आलेला बेन स्टोक्स 5 धावा करून माघारी गेला.

यानंतर कर्णधार जॉस बटलर आणि हॅरी ब्रुक्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आफ्रिकेच्या गेराल्ड कोट्झीने 3 विकेट्स घेत इंग्लंडची अवस्था 7 बाद 84 अशी केली. यानंतर डेव्हिड विली आणि एटकिनसन यांनी इंग्लंडला शंभरी पार करून दिली.

मात्र विली बाद झाल्यानंतर मार्क वूडने 17 चेंडूत 43 धावा ठोकत इंग्लंडला 170 धावांपर्यंत मजल मारून लाज वाचवली. अखेर एटकिनसनला महाराजने 35 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टोप्ले दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.