Under-19 Cricket World Cup : वाद, हिंसा होण्याचा धोका... दक्षिण आफ्रिका क्रिकेटने कर्णधाराला हटवलं

Under-19 Cricket World Cup
Under-19 Cricket World Cupesakal
Updated on

Under-19 Cricket World Cup : 19 वर्षाखाली वर्ल्डकप सुरू होण्यास काही आठवडेच शिल्लक आहेत. मात्र त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी 19 वर्षाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या कर्णधाराला हटवलं आहे. हा निर्णय पायउतार होणारा कर्णधार डेव्हिड टीजेरने इस्रायलचे समर्थन करणारे वक्तव्य केल्यानंतर घेण्यात आला आहे. डेव्हिडने इस्रायल सैनिकांचे समर्थन केलं होतं.

त्यानंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकेने या वक्तव्यानंतर विरोधी ग्रुपकडून प्रदर्शनादरम्यान वाद आणि हिंसा देखील केली जाऊ शकते त्यामुळे डेव्हिडला कर्णधारपदावरून हटवण्यात येत असल्याचे सांगितले.

Under-19 Cricket World Cup
Rohit Sharma : वर्ल्डकपला सामोरे जाताना... रोहितचं ते एक वक्य अन् हार्दिक पांड्याचा जीव झाला वरखाली

क्रिकेट साऊथ आफ्रिकेने सांगितले की डेव्हिडला जरी कर्णधारपदावरून हटवलं असलं तरी त्याला संघात मात्र कायम ठेवण्यात आलं आहे. संघटनेने हा निर्णय सर्व खेळाडूंचे हित पाहून घेतल्याचे देखील सांगितले.

सीएसएने आपल्या वक्तव्यात म्हटले की, 'क्रिकेट साऊथ आफ्रिकेला वर्ल्डकपदरम्यान सातत्याने सुरक्षेसंदर्भातील अपटेड मिळत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं आहे की गाझामधील युद्धासंदर्भातील आंदोलने स्पर्धेच्या ठिकाणी देखील होऊ शकतात.'

Under-19 Cricket World Cup
Ishan Kishan : संपर्कच केला नाही... इशान किशनबाबत झारखंड क्रिकेट असोसिएशनने केला मोठा दावा

'आम्हाला सांगण्यात आलं की त्यांचे लक्ष हे कर्णधार डेव्हिड टीजेर याच्यावर असेल. त्याच्याबाबतीत वाद आणि हिंसा देखील होण्याचा धोका आहे. खेळणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षा ही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची प्राथमिकता आहे. आम्ही सुरक्षा संस्थांचा सल्ल्याचा आदर राखण्याचा निर्णय घेतला.

सर्व परिस्थितीचा विचार करून या स्पर्धेसाठी डेव्हिडला कर्णधारपदातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खेळाडूंच्या आणि खुद्द डेव्हिडच्या हितासाठी घेण्यात आला आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.