RSA vs IND 1st ODI : शार्दुलची फिफ्टी; टीम इंडिया हारली!

South Africa vs India, 1st ODI
South Africa vs India, 1st ODISakal
Updated on

पार्ल : कसोटी मालिकेनंतर भारतीय संघाच्या पराभवाची मालिका कायम राहिली. पहिल्या वनडे सामन्यात सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूरच्या अर्धशतकानंतर टीम इंडियाला 35 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा आणि दुसेन यांनी शतकी खेळी करत निर्धारित 50 षटकात 4 बाद 296 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 8 बाद 265 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बोलँड पार्कवर झाला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची माळ गळ्यात पडलेल्या केएल राहुलसाठी (KL Rahul) ही मालिका लिटमस टेस्ट होती. विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर केएल राहुल कसोटी कॅप्टन्सीच्या रेसमध्ये आला आहे. आता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून आपली दावेदारी प्रबळ करण्याची संधी होती. पण ही सुरुवातच खराब झालीये. त्याला स्वत:ला धावा करता आल्या नाही. याशिवाय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. (South Africa vs India 1st ODI Live Update KL Rahul Captaincy)

214-8 : शम्सीनं भुवीला अवघ्या चार धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

199-7 : फेहलुकवायोच्या खात्यात आणखी एक यश, रविचंद्रन अश्विन 7 धावांवर बाद

188-6 : व्यंकटेश अय्यर पदार्पणाच्या सामन्यात छाप पाडण्यात अपयशी; एनिग्डीनं घेतली विकेट

182-5 : फेहलुकवाओनं पंतला धाडलं तंबूत, पंतने 22 चेंडूत 16 धावा केल्या

181-4 : श्रेयस अय्यर 17 धावांची भर घालून परतला; लुंगी एनिग्डीनं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन

152-3 : शम्सीनं कोहलीच्या रुपात टीम इंडियाला दिला तिसरा धक्का, कोहलीनं 63 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीनं 51 धावा केल्या

कोहलीनं रचला नवा विक्रम, वनडेमध्ये परदेशात सर्वाधिक धावा करणारा बनला खेळाडू

138-2 : केशव महाराजला मिळालं महत्त्वपूर्ण यश, शिखर धवन 84 चेंडूत 79 धावा काढून तंबूत

शिखर धवनचं दमदार कमबॅक ; अर्धशतकी खेळीसह सावरला संघाचा डाव

46-1 : कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुल 12 धावांची भर घालून माघारी, टीम इंडियाला पहिला धक्का

टीम इंडियासमोर 297 धावांचे लक्ष्य

निर्धारित 50 षटकात दक्षिण आफ्रिका 4 बाद 296 धावा

रस्सी व्हॅन डर दुसेन नाबाद 129 (96)

टेम्बा बवुमा 110(143)

क्विंटन डिकॉक 27(41)

-------------------

बुमराह 2 विकेट्स

अश्विन 1 विकेट्स

272-4 : बवुमानं 143 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 110 धावांची खेळी केली. त्याला बुमराहने लोकेश राहुलकरवी झेलबाद केले

बवुमापाठोपाठ रस्सी डर दुसेन याचं दमदार अर्धशतक, भारतीय गोलंदाजांचे पाडले खांते

टेंम्बा बवुमाची कर्णधाराला साजेशी खेळी, अर्धशतकासह संघाचा डाव सावरला

68-3 : व्यंकटेश अय्यरची जबरदस्त फिल्डिंग, मार्करमला 4 धावांवर रन आउट करुन धाडले माघारी

58-2 : सलामीवीर क्विंटन डिकॉकनं 41 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 27 धावा केल्या, अश्विनने त्याच्या रुपात संघाला दुसरे यश मिळवून दिले

क्विंटन डिकॉक अन् बवुमा जोडीनं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला

19-1 : टीम इंडियाला बुमराहनं मिळवून दिले पहिलं यश; जानेमन मलान 6 धावांची भर घालून तंबूत

  • व्यंकटेश अय्यर करणार पदार्पण, शिखर येणार सलामीला.

  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.