South Africa Vs India 1st Test Day 2 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 11 धावांची आघाडी घेतली. केएल राहुलच्या (101) शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या. आफ्रिकेने देखील आपल्या पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत दिवस अखेर 5 बाद 256 धावा केल्या आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेत आपलं खातं उघडलं.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 5 बाद 256 धावा करत 11 धावांची आघाडी घेतली होती. मात्र अंधुक प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला आहे. खेळ थांबला त्यावेळी डीन एल्गर 140 धावा करून नाबाद होता.
सिराजने सेट झालेल्या बेडिंगहमला बाद केल्यानंतर आलेल्या कायल व्हेरेयन्नेला प्रसिद्ध कृष्णाने बाद करत आफ्रिकेला पाचवा धक्का दिला.
डीन एल्गर आणि डेव्हिड बेडिंगहमने चौथ्या विकेटसाठी 131 धावांची दमदार भागीदारी रचली. अखेर तिसऱ्या सत्रात मोहम्मद सिराजने ही जोडी फोडली. त्याने बेडिंगहमला 56 धावांवर बाद केलं.
तिसऱ्या सत्रात देखील एल्गर आणि बेडिंगहमने दमदार फलंदाजी करत आफ्रिकेला 200 धावांच्या पार पोहचवले.
दुसऱ्या सत्रात डीन एल्गरने शतक ठोकत आफ्रिकेला 200 धावांच्या जवळ पोहचवले. त्याने डेव्हिड बेडिंगहमसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद 81 धावांची भागीदारी रचली आहे. आफ्रिका अजून 51 धावांनी पिछाडीवर आहे.
एल्गर आणि देझॉर्जीने दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी रचली. एल्गरने अर्धशतक ठोकले होते. मात्र जसप्रीत बुमराहने देझॉर्जीला 28 धावांवर आणि कीगन पिटर्सनला 2 धावांवर बाद करत आफ्रिकेला पाठोपाठ दोन धक्के दिले.
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज डीन एल्गरने दमदार अर्धशतक ठोकत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने टोन दे झॉर्जी सोबत नाबाद 70 धावांची भागीदारी रचली.
डीन एल्गर आणि टॉनी दे झोर्जीने दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची नाबाद भागीदारी रचत आफ्रिकेला 49 धावांपर्यंत पोहचवले.
दक्षिण आफ्रिकेने आपला पहिला डाव सुरू केल्यानंतर मोहम्मद सिराजने एडिन माक्ररमला 5 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.
अखेर बर्गरने केएल राहुलचा 101 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पिहला डाव 245 धावांवर संपवला.
केएल राहुलने भारताची शेवटची जोडी मैदानावर असाताना आणि शतकासाठी 5 धावांची गरज असताना षटकार मारत आपले शतक पूर्ण केलं.
केएल राहुलने दुसऱ्या दिवशी चांगली फटकेबाजी करत भारताला 240 धावांच्या आसपास पोहचवले. तो आपल्या शतकाच्या देखील जवळ पोहचला होता. मात्र मोहम्मद सिराजला कॉट्झीने 5 धावांवर बाद केले. यामुळे आता प्रसिद्ध कृष्णावर बाद न होता केएलचं शतक पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी आहे.
उशिरा का होईना दुसऱ्या दिवसाचा खेळ अखेर सुरू झाला आहे. वातावरण अजून ढगाळ असल्याने चेंडू चांगलाच स्विंग होत आहे.
भारताचा मधल्या फळातील फलंदाज केएल राहुलने झुंजार 70 धावा करत भारताला 200 पार पोहचवले होते. काल तो 70 धावांवर नाबाद होता. आज दुसऱ्या दिवशी भारत 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात करेल.
दुसऱ्या दिवशी देखील मैदान ओलं असल्याने खेळ सुरू होण्यास उशीर होत आहे. काल शेवटच्या सत्रात देखील पावसामुळे दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.