Video: दिवसात 18 विकेट्स पडल्या, कोहली मात्र जाम खूष

Virat Kohli Dancing
Virat Kohli Dancing esakal
Updated on

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या कसोटीत दुसरा दिवस पाण्यात गेला. मात्र तिसऱ्या दिवसाने दुसऱ्या दिवसाची संपूर्ण कसर भरुन काढली. तिसऱ्या दिवशी खेळ इतका वेगवान झाला की वाया गेलेल्या दुसऱ्या दिवसाचा कोणताच परिणाम सामन्यावर दिसला नाही. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने (South Africa) भारताच्या (India) 55 धावात 7 विकेट्स घेतल्या. या दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान खेळाला भारतानेही वेगवान उत्तर दिले. तिसऱ्याच दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघच पॅव्हेलियनमध्ये धाडला.

Virat Kohli Dancing
वॉर्नरला अ‍ॅशेस राखल्यानंतर आता भारतात करायचीये 'ही' कामगिरी

भारताच्या या कामगिरीवर विराट कोहली (Virat Kohli) जाम खूष दिसला. भारताने सामन्यावरील गमावलेले नियंत्रण तिसऱ्या दिवशीच परत मिळवत संघाची स्थिती मजबूत केली. मोहम्मद शामीने (Mohammed shami) दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यामुळे भारताला आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावात गुंडाळण्यात यश आले. भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या त्यामुळे भारताकडे १३० धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली.

Virat Kohli Dancing
U-19 Asia Cup: पंच कोरोना पॉझिटिव्ह, सामना अर्ध्यात थांबवला

दरम्यान भारताच्या या धडाकेबाज कामगिरीवर कर्णधार विराट कोहली जाम खूष दिसला. त्यामुळेच त्याने दिवसाच्या शेवटच्या सत्रात षटक संपल्यानंतर डान्स केला. विराट मैदानावर डान्स (Virat Kohli Dancing) करण्यात पटाईत आहे. त्याने अनेक वेळा मैदानात डान्स करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचा मैदानावरील उत्साह पाहून प्रेक्षकही त्याला चांगली दाद देत असतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी देखील विराट कोहलीने डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.