SA vs IND: तिसऱ्या दिवसाच्या खेळात काय काय घडलं

SA vs IND
SA vs INDANI
Updated on

सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीतील संपूर्ण दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी (South Africa vs India 1st Test Day) 3तरी खेळ सुरु होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र अखेरीस पावसाने उसंत दिली असून भारताने आपला पहिला डाव 3 बाद 272 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.

भारताने पहिल्या दिवशी 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 272 धावांपर्यंत मजल मारली होती. केएल राहुल दमदार शतक ठोकत नाबाद होता. तर अजिंक्य रहाणे देखील 40 धावांची खेळी करुन नाबाद होता. राहुल बरोबरच दुसरा सलामीवीर मयांक अग्रवाल याने देखील 60 धावांची खेळी करत भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. (South Africa vs India 1st Test Day 3)

चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा निराशा केली. तो शुन्यावर बाद झाला. तर कर्णधार विराट कोहलीला देखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 35 धावांवर बाद झाला होता.

12-1 : मयांक अग्रवालच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का; मार्को जानेसन याला मिळाले यश

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांत आटोपला

मोहम्मद शमी आणि भारताच्या अन्य गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फोल ठरले. बवुमाचं अर्धशतक वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. पहिल्या डावानंतर भारतीय संघाने 130 धावांची आघाडी घेतली आहे.

197-10 : दुखापतीतून सावरून परतलेल्या बुमराहनं घेतली दक्षिण आफ्रिकेची अखेरची विकेट

193-9 : कागिसो रबाडाने 45 चेंडूत केल्या 25 धावा, शमीनं पंतकरवी केलं झेलबाद

181-8 : मार्को जानसेनच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का, शार्दुल ठाकूरनं त्याला 19 धावांवर धाडले तंबूत

144-7 : अर्धशतकी खेळी करुन एकाकी झुंज देणाऱ्या बवुमालाही शमीन धाडलं माघारी; त्याने 103 चेंडूत 10 चौकाराच्या मदतीने 52 धावांची खेळी केली

133-6 : मुल्डरच्या रुपात शमीनं दक्षिण आफ्रिकेला दिला सहावा दणका

104-5 : आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत; शार्दुल ठाकूरनं क्विंटन डिकॉकला केलं बोल्ड, त्याने 63 चेंडूत 34 धावांची खेळी केली

32-4 : रस्सी व्हॅम डेर दुसेनच्या रुपात आफ्रिकेनं गमावली आणखी एक विकेट, सिराजच्या गोलंदाजीवर रहाणेनं घेतला सुंदर कॅच

30- मैदानात तग धरून थांबण्याची क्षमता असलेला मार्करमही 15 धावा करुन माघारी, शमीला दुसरे यश

25-2 : कीगन पीटरसेनही तंबूत, शमीनं 15 धावांवर त्याला माघारी धाडले

2-1 : डेन एल्गर स्वस्तात माघारी; बुमराहनं पहिल्याच षटकात आफ्रिकेला दिला दणका

एन्गिडीने भारताच्या फलंदाजीला लावला सुरुंग, भारताचा पहिला डाव 327 डावात आटोपला

भारताचे सात फलंदाज अवघ्या 55 धावात माघारी

एन्गिडीचा भेदक मारा, 71 धावात 6 भारतीय फलंदाजांना धाडले माघारी

भारताला पाठोपाठ दोन धक्के, रबाडाने राहुलला (123) तर एन्गिडीने अजिंक्यला (48) केले बाद

केएल राहुल 122 तर अजिंक्य रहाणे 40 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात

तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.