South Africa vs India, 1st Test : सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघाने मजबूत आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशीच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांत आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून दिवसाअखेर टीम इंडियाने 1 बाद 16 धावा केल्या आहेत. मयांक अग्रवालच्या रुपात टीम इंडियाने आपली पहिली विकेट गमावली. लोकेश राहुल 19 चेंडूत 5 धावा करुन नाबाद खेळत आहे. (South Africa vs India 1st Test Day 3)
दुसऱ्या बाजूला नाईट वॉचमन म्हणून शार्दुल ठाकूर मैदानात उतरला होता. त्याने 5 चेंडूचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने 4 धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे 146 धावांची आघाडी असून चौथ्या दिवशी ही जोडी किती धावा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जानेसन याने मयांकची विकेट घेतली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसावर पावसाने पाणी फेरले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनीही निराश केले. लोकेश राहुल अवघ्या एका धावेची भर घालून 123 धावांवर तंबूत परतला. दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणेला अर्धशतकाने अवघ्या हुलकावणी दिली. त्याने 48 धावा केल्या. 3 बाद 272 धावांवरुन तिसऱ्या दिवसाची सुरुवात केलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनिग्डीनं सर्वाधिक 6 तर रबाडाने 3 विकेट घेतल्या.
भारतीय गोलदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरश: नाचवले. जसप्रित बुमराहने पहिल्याच षटकात सलामीवीर एल्गरला तंबूत धाडले. मार्करम (13), पीटरसेन (15), व्हेन डेर दुसेन (3) स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डिकॉक आणि बवुमा या जोडीनं 72 धावांची भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. डिकॉक 34 धावांवर बाद झाला. टेम्बा बवुमाने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. त्यांचा पहिला डाव 197 धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद शम्मीनं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. त्याला इतर गोलंदाजांनी सुरेख साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.