RSA vs IND: आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज बाद, कॅप्टन एकटा लढतोय
सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India 1st Test Day 4) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला सामन्यावरील आपली पकड मजबूत करण्याची संधी आहे. भारताने तिसऱ्या दिवशी 327 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावात गुंडळात पहिल्या डावात 130 धावांची भक्कम आघाडी घेतली.
भारताने आपला दुसरा डाव तिसऱ्या दिवशीच सुरु केला होता. यावेळी भारताने 1 बाद 16 धावांपर्यंत मजल मरली होती. मयांक अग्रवाल 4 धावांची भर घालून माघारी गेला होता. आता भारताला चौथ्या दिवशी चांगली फलंदाजी करुन दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे आव्हान ठेवण्याची संधी आहे. (South Africa vs India 1st Test Day 4)
चौथ्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने 4 गडी गमावून 94 धावा केल्या आहेत. अजूनही त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज आहे
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची आश्वासक खेळी, डेन एल्गरनं पूर्ण केले अर्धशतक
बुमराहने आफ्रिकेला दिला आणखी एक धक्का, रस्सी व्हॅन डर दुसेन 65 चेंडूत 11 धावा करुन फिरला माघारी
सिराजन टीम इंडियाला मिळवून दिलं दुसर यश कीगेन पीटरसेन 36 चेंडूत 17धावा करुन तंबूत परतला
आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात; पहिली विकेटही गमावली
दुसऱ्या डावात रिषभ पंतनं केलेली 34 धावांची खेळी ही भारतीय डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली
दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा-मार्कोनं प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर लुंगी एनिग्डीनं दोन विकेट मिळवल्या
भारतीय संघाचा दुसरा डाव 174 धावांत आटोपला आहे. या धावांसह भारतीय संघाने यजमानांसमोर 305 धावांच आव्हान ठेवले आहे.
विराट कोहलीकडून पुन्हा निराशा जर्सी नंबर एवढ्याच धावा करुन फिरला माघारी
लंचपर्यंत भारताची आघाडी पोहचली 200 च्या पार, विराट - पुजारा रचत आहेत भागीदारी
भारताला तिसरा धक्का, केएल राहुल 23 धावा करुन बाद, भारताकडे 191 धावांची आघाडी
भारताला दुसरा धक्का, नाईट वॉचमन शार्दुल ठाकूर 10 धावांची भर घालून परतला.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु, भारताची दीडशे पार आघाडी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.