'तिसरी कसोटी म्हणजे १५ वर्षातील सर्वात मोठा सामना'

Dean Elgar big Statement 3rd Test
Dean Elgar big Statement 3rd Testesakal
Updated on

केपाटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक कसोटी समना आजपासून ( दि. ११) केपटाऊन येथे सुरु होत आहे. मालिकेतला पहिला सामना भारताने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकत मालिका बरोबरीत आणली आहे. त्यामुळे आता सर्वांच्याचीच नजर तिसऱ्या कसोटीवर असणार आहे. दरम्यान, तिसरी कसोटी सुरु होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) विराट कोहली (Virat Kohli) संदर्भात एक मोठे विधान केले. (South Africa vs India Dean Elgar big Statement About 3rd Captown Test)

Dean Elgar big Statement 3rd Test
द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेटमधले 'मनमोहन सिंग'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध झाल्याचे दिसले होते. आता भारतीय संघात (Indian Captain Virat Kohli) कर्णधार विराट कोहली परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि निर्णयाक केपटाऊन कसोटीत आणखी शाब्दिक युद्धं दिसतील यात शंका नाही. याबाबत बोलताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) म्हणाला. 'विराट खेळामध्ये एक नवा पैलू जोडतो. मला नाही वाटत की मला त्याची उणीव भासली. मात्र कॅप्टन म्हणून असो की रणनितीच्या दृष्टीने असो त्याच्या संघाला त्याची उणीव नक्कीच भासली असेल.'

Dean Elgar big Statement 3rd Test
शाहरुख-जुहीचा मास्ट्रर स्ट्रोक; कॅप्टन्सीसाठी मुंबईकराला हेरलं

डीन एल्गर पुढे म्हणाला की, 'विराट कोहली जागतिक स्तरावरील अव्वल फलंदाज आहे. तो आपल्या संघात सर्वात अनुभवी आहे. त्याचे नावच पुरेसे आहे. तो एक सन्मानित क्रिकेटर आहे. परंतु दुसऱ्या कसोटीच त्याची कमतरता मला जाणवली असे नाही. आमच्या विरुद्ध कोण खेळत आहे हे महत्वाचे नाही. आम्हाला आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.'

एल्गरने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात ९६ धावांची चिवट खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला (South Africa) मालिकेत १ - १ अशी बरोबरी साधण्यात यश आले. त्यामुळे आता तिसरा कसोटी सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे. भारताला आफ्रिकेतील ऐतिहासिक पहिल्या मालिका विजयसाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

Dean Elgar big Statement 3rd Test
सिद्धार्थच्या स्पष्टीकरणावर सायनाचे वडील भडकले

दुसऱ्या बाजूला एल्गरनेही या समन्याबाबत मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला, 'तिसरा कसोटी सामना आमच्यासाठी १० ते १५ वर्षातील सर्वात मोठा कसोटी सामना असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाचही दिवस तेवढ्याच ताकदीने खेळ करावा लागतो. मात्र पाचही दिवस सर्व ताकदीनिशी खेळणे शक्य होत नाही हे मला माहिती आहे. पण, तुम्हाला सातत्य राखणे गरजेचे असते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.