...तर रोहित शर्मा ऐवजी हा खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन

Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

South Africa vs India ODI : भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ या दौऱ्यावर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. नव्या वर्षात 19 जानेवारीपासून वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. स्नायू दुखापतीमुळे उप कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.

विराट कोहलीनं (Virat Kohli) टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोडल्यानंतर टी-20 सह वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर देण्यात आले आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाने घरच्या मैदानावर जी टी-20 मालिका खेळली त्यात रोहितच संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. पण वनडे सामन्यात आता तो खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे.

Rohit Sharma
अर्जुनची सुपर 10 ची हॅटट्रिक, जयपूरसमोर यूपी योद्धा 'घायाळ'

जर दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी तो फिट झाला नाही तर भारतीय संघाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जर रोहित या मालिकेला मुकणार असेल तर बीसीसीआय निवड समिती कार्यवाहू कर्णधाराची घोषणा करु शकते. सध्याच्या घडीला रोहित दुखापतीतून सावरला नसल्याचे समजते. त्यामुळे अद्याप बीसीसीआयने (BCCI) वनडे टीम सिलेक्शनसाठी (ODI Team Selection) वेळ घेत आहे. जर रोहित वनडे मालिकेलाही मुकला तर त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल (KL Rahul) भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसू शकते.

Rohit Sharma
U19 Asia Cup : पाक अव्वल; पण युवा टीम इंडियानंही गाठली सेमीफायनल

लोकेश राहुलची कसोटीत दमदार कामगिरी

सेंच्युरिय कसोटीत लोकेश राहुलनं कमालीची फलंदाजी केलीय. पहिल्या दिवशीच त्याने शतकाला गवसणी घातली. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. याशिवाय आफ्रिका दौऱ्यावर शतकी खेळी करणारा तो वासीम जाफरनंतर दुसरा खेळाडू ठरलाय.

Rohit Sharma
PKL 2021 : U MUMBA नं 30 सेकंदात पलटलेला सामना अखेर बरोबरीत

भारतीय संघाचे वनडेचं वेळापत्रक

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत 19 जानेवारी 2021 पहिला सामना

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत 21 जानेवारी 2021 दुसरा सामना

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत 23 जानेवारी 2021 तिसरा सामना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.