दुसऱ्या कसोटीला मुकणाऱ्या विराटला झालयं तरी काय?

Virat Kohli Injury
Virat Kohli Injury esakal
Updated on

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी विराट कोहलीने नेटमध्ये चांगलाच घाम गाळला होता. नव्या वर्षातील पहिल्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ संपवले असे वाटत होते. मात्र सामन्याच्या नाणेफेकीसाठी विराट कोहली ऐवजी के.एल. राहुल मैदानात आला आणि सर्वांनाच धक्का बसला. नाणेफेक झाल्यानंतर राहुलने विराट कोहली न येण्याचे कारण सांगितले. (South Africa vs India Surprise News About Cpatian Virat Kohli Injury)

Virat Kohli Injury
श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूवर झाला होता बलात्कार?

के.एल. राहुलने (KL Rahul) सांगितले की, विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास (Upper Back Spasm) होऊ लागल्याने तो दुसरी कसोटी खेळणार नाही. फिजिओ त्याच्या दुखापतीवर (Virat Kohli Injury) लक्ष ठेवून आहेत. आशा आहे की तो फिट होईल आणि तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरले. विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारीची (Hanuma Vihari) संघात वर्णी लागली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला येणार हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे. हनुमा विहारी विराटच्या जागेवर फलंदाजी करणार की अजिंक्य रहाणेला बढती देऊन रहाणेची जागा विहारी घेणार का हे पहावे लागले.

Virat Kohli Injury
जोहान्सबर्ग कसोटीची घंटी वाजणारी सिपोकाजी आहे तरी कोण?

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पहिली सेंच्युरियन कसोटी जिंकत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरले. दुसरीकडे क्विंटन डिकॉकच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसरी कसोटी जिंकणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.