SA vs NZ : सर्वाधिक षटकार, सर्वाधिक वेळा 350+ धावा... एका का दोन आफ्रिकेने खंडीभार विक्रम करत न्यूझीलंडला आणलं जेरीस

SA vs NZ Records
SA vs NZ Recordsesakal
Updated on

SA vs NZ Records : वर्ल्डकप 2023 च्या पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने 50 षटकात 4 बाद 357 धावा केल्या. सलामीवीर क्विंटन डिकॉकने 114 तर रॅसी वेन डेर दुसेनने 118 चेंडूत 133 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी रचली. त्याचबरोबर डेव्हिड मिलरनेही 30 चेंडूत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने आपल्या या एकाच डावत अनेक वर्ल्डकप विक्रम मोडले. (ODI Cricket Records)

SA vs NZ Records
Sachin Tendulkar Statue : सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न; मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांचीही उपस्थिती

वनडे वर्ल्डकपमध्ये एका विकेटकिपरने मारलेले सर्वाधिक षटकार

क्विंटन डिकॉक - 22

एडम गिलख्रिस्ट - 19

मार्क बाऊचर - 15

एम. एस. धोनी - 15

एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विकेटकिपर

क्विंटन डिकॉक (2023) - 545

कुमार संगकारा (2015) - 541

कुमार संगकारा (2011) - 465

एडम गिलख्रिस्ट (2007) - 453

न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सर्वात मोठी खेळी करणारा खेळाडू

डेव्ह कलागहन (1994) - 169 नाबाद

हर्शेल गिब्ज (2003) - 143

रासी वॅन डेर दुसेन (2023) - 133

न्यूझीलंडविरूद्धची दक्षिण आफ्रिकेची सर्वोच्च धावसंख्या

पुणे 2023 - 4 बाद 357 धावा

सेंच्युरियन 2000 - 4 बाद 324 धावा

सेंच्युरियन 1994 - 7 बाद 314 धावा

जोहान्सबर्ग 2003 - 6 बाद 306 धावा

SA vs NZ Records
Quinton de Kock : 6 सामन्यात 4 शतकं! क्विंटन डिकॉकने रचला इतिहास, आता रडारवर रोहित

एका वर्ल्डकपमध्ये एका संघाने मारलेले सर्वाधिक षटकार

दक्षिण आफ्रिका 2023 - 82*

इंग्लंड 2019 - 76

वेस्ट इंडीज 2015 - 68

ऑस्ट्रेलिया 2007 - 67

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 350 पेक्षा जास्त धावा करणारे संघ

ऑस्ट्रेलिया - 9

दक्षिण आफ्रिका - 9

भारत - 4

*दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलग आठव्या डावात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

प्रथम फलंदाजी करताना यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 41 ते 50 षटकात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी

दिल्ली - श्रीलंकेविरूद्ध 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 137 धावा

लखनौ - ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 79 धावा

मुंबई - इंग्लंड विरूद्ध 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 143 धावा

मुंबई - बांगलादेश विरूद्ध 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 144 धावा

पुणे - न्यूझीलंडविरूद्ध 2 फलंदाजांच्या मोबदल्यात 119 धावा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.