SA vs IND : काहीतरी गडबड झाली आहे... दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकालाच खेळपट्टी समजली नाही

SA vs IND
SA vs IND esakal
Updated on

South Africa Vs India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेची अवस्था दयनीय करून टाकली आहे. पहिल्या दिवशीच दोन्ही संघाच्या मिळून 23 विकेट्स पडल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक अॅश्वेल प्रिन्सने खेळपट्टीबद्दल तक्रारीचा सूर लावला.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेला भारतीय संघाने एका सत्रातच 55 धावात पॅव्हेलियनमध्ये धाडले. मोहम्मद सिराजने 6 तर बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

SA vs IND
Sa vs Ind 2nd Test : भारताने दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका सोडवली बरोबरीत

त्यानंतर भारताने पहिल्या डावात 4 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारताचे सहा फलंदाज एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतले. भारताला पहिल्या डावत 98 धावांची आघाडी मिळाली होती.

त्यानंतर दुसऱ्या डावात देखील आफ्रिकेची अवस्था बिकट झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच आफ्रिकेचे 3 फलंदाज 62 धावात माघारी फिरले. कसोटीच्या पहिल्या दिवशीच तिसरा डाव सुरू झाला अन् 270 धावात तब्बल 23 विकेट्स पडल्या.

प्रिन्स म्हणाला की, 'पहिल्या दिवशी खेळपट्टी एवढी वेगवान यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. एक फलंदाज म्हणून जोपर्यंत चेंडू समान उसळी घेतोय तोपर्यंत वेग उपयुक्तच ठरत असतो. मात्र आज चेंडू असमान उसळी घेत होता. खेळपट्टीवर पहिल्या दिवशी चेंडू सीम होईल याची अपेक्षा होती. मात्र असमान उसळी अन् चेंडू सीम होणं ही परिस्थितीच वेगळी असते.'

SA vs IND
कसोटीचाही कर्णधार बदलला! आता 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची कमान

प्रिन्स पुढे म्हणाला की, 'कधी कधी चांगली गोलंदाजी असलेला संघ प्रतिस्पर्ध्यांना स्वस्तात माघारी धाडतात. ज्यावेळी दोन्ही संघातील फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजीच करू शकत नाहीत इथं काहीतरी चुकतंय.'

खेळपट्टीवर थोडं गवत आहे मात्र न्यूलँड्सची खेळपट्टी ही नंतर फिरकीला पोषक ठरते. त्यामुळे फलंदाजीला ती नक्की मदत करेल असं वाटतं. त्यामुळे मला नाही वाटत की खेळपट्टी अशी खेळेल असा अंदाज कोणी वर्तवला असेल.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.