Duleep Trophy : सर्फराझच्या विकेटमुळे कलाटणी; पश्‍चिम विभागावर मात करत दक्षिण विभागाने पटाकावले विजेतेपद

Duleep Trophy : सर्फराझच्या विकेटमुळे कलाटणी; पश्‍चिम विभागावर मात करत दक्षिण विभागाने पटाकावले विजेतेपद
Updated on

Duleep Trophy : दक्षिण विभागाने रविवारी गतविजेत्या पश्‍चिम विभागावर ७५ धावांनी मात करीत दुलीप क्रिकेट करंडकाच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली. वेगवान गोलंदाज विदवाथ कावेरप्पा याने आठ फलंदाज बाद करीत सामन्याचा मानकरी होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेमध्ये त्याचीच मालिकावीर म्हणूनही निवड करण्यात आली. त्याने १५ फलंदाज बाद केले.

Duleep Trophy : सर्फराझच्या विकेटमुळे कलाटणी; पश्‍चिम विभागावर मात करत दक्षिण विभागाने पटाकावले विजेतेपद
Asia Cup 2023: केएल राहुल आशिया कपमधुन बाहेर? दिग्गज खेळाडू करू शकतो पुनरागमन

दक्षिण विभागाकडून पश्‍चिम विभागासमोर २९८ धावांच्या आव्हानाचे लक्ष्य ठेवण्यात आले. पश्‍चिम विभागाने चौथ्या दिवसअखेरीस ५ बाद १८२ धावा फटकावल्या होत्या. पृथ्वी शॉ, हार्विक देसाई, चेतेश्‍वर पुजारा, सूर्यकुमार यादव व सर्फराझ खान हे फलंदाज बाद झाल्यानंतर पश्‍चिम विभागाचा पाय खोलात गेला होता, पण प्रियांक पांचाल हा खेळपट्टीवर उभा असल्यामुळे पश्‍चिम विभागाकडे विजयाची अंधूक संधी होती.

विदवाथ कावेरप्पा याने सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच प्रियांक याला यष्टिरक्षक रिकी भुईकरवी झेलबाद करीत पश्‍चिम विभागाला मोठा धक्का दिला. प्रियांकने ११ चौकारांसह ९५ धावांची दमदार खेळी साकारली, पण त्याला विजय मिळवून देता आला नाही. पश्‍चिम विभागाचा दुसरा डाव २२२ धावांवरच आटोपला. वासुकी कौशिक व साई किशोर यांनी प्रत्येकी चार फलंदाज बाद केले.

Duleep Trophy : सर्फराझच्या विकेटमुळे कलाटणी; पश्‍चिम विभागावर मात करत दक्षिण विभागाने पटाकावले विजेतेपद
Wimbledon Final 2023 Video: फायनलमध्ये जोकोविच भलताच संतापला, रागाच्या भरात मोडले रॅकेट अन्...

सर्फराझच्या विकेटमुळे कलाटणी

दक्षिण विभाग संघाचा कर्णधार हनुमा विहारी याप्रसंगी म्हणाला, चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात सर्फराझ खानला बाद करता आले. हाच लढतीला कलाटणी देणारा क्षण ठरला.

संक्षिप्त धावफलक ः दक्षिण विभाग पहिला डाव २१३ धावा आणि दुसरा डाव २३० धावा विजयी वि. पश्‍चिम विभाग पहिला डाव १४६ धावा आणि दुसरा डाव २२२ धावा (प्रियांक पांचाल ९५, चेतेश्‍वर पुजारा १५, सर्फराझ खान ४८, धमेंद्र जडेजा १५, वासुकी कौशिक ४/३६, साई किशोर ४/५७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.