Southampton weather Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरु असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. तर दुसऱ्या दिवसातील अंधूक प्रकाशामुळे वेळेआधीच सामना थांबवावा लागला. तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावारण होतं. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी (India vs New Zealand WTC Final) दोन विकेटच्या मोबदल्यात 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज तंबूत परतले आहेत. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागिदारी केली. न्यूझीलंडचा संघ अद्याप 116 धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघानं पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत.
AccuWeather ने, सोमवार 21 जून रोजी साउदम्प्टनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावासामुळे पहिले आणि तिसरे सत्र वाया जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या सत्रावेळी ढगाळ वातावरण राहू शकते. सकाळी आणि सायंकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असा परिस्थितीत सामन्याच्या चौथ्या दिवसी किती षटकांचा खेळ होतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेत सतत येणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये पाऊस पडत असतो, हे माहित असतानाही इथं अंतिम सामना का घेतला? असा प्रश्न क्रीडा प्रेमींकडून विचारण्यात येत आहे.
WTC Final च्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी साउदम्प्टनमध्ये 60 टक्के पावासाची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर दुपारी तीन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर चार ते सहा या दरम्यान पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
तिसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचं वर्चस्व
मेगा फायनलमध्ये न्यूझीलंडचा संघ भारताच्या एक पाऊल पुढेच आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव उरकून फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंड संघाने दिवसाअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा संघ 116 धावांनी पिछाडीवर आहे. सलामीवर टॉम लॅथम आणि डेवोन कॉन्वे या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली असताना अश्विनने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याने टॉम लॅथमला विराट करवी झेलबाद केले. लॅथमने 104 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 30 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर डेवोन कॉन्वेच्या रुपात ईशांतने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. बाद होण्यापूर्वी कॉन्वेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिले-वहिले अर्धशतक आपल्या नावे नोंदवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 12(37)* आणि रॉस टेलर 0(2) नाबाद परतले. आतापर्यंतच्या खेळाचा विचार केल्यास न्यूझीलंडचा संघ सामन्यात टीम इंडियाच्या तुलनेत एक पाऊल पुढेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.