Sports Bulletin 29th October: न्यूझीलंडविरूद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना भारताने ६ विकेट्ने जिंकला तर मालिकेत २-१ ने विजय मिळवला. या सामन्यात स्मृती माधनाने विक्रमी शतक झळकावले. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील मुंबईचा त्रिपुराविरूद्धचा तिसरा सामना अनिर्णित राहीला. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली..क्रीडा विश्वातील अशा सर्व अपडेट्स घडामोडी पाहूयात...
INDW vs NZW 3rd ODI: भारतीय महिला संघाने वन-डे मालिकेतील न्यूझीलंडविरूद्धचा अंतिम सामना ६ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत २-१ ने विजय मिळवला. यावेळी १० चौकारांच्या मदतीने स्मृती माधनाने विक्रमी शतक ठोकले. स्मृतीने वन-डे क्रिकेटमध्ये ७ शतके झळकावणाऱ्या मिताली राजला मागे टाकले व वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी भारतीय महिला फलंदाज ठरली. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने ५९ धावांची नाबाद खेळी केली. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
Matthew Wade Retirement: ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला २०२१ साली पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात मॅथ्यू वेडने महत्वपूर्ण योगदान दिले होते. परंतु मागच्या टी२० वर्ल्ड कपनंतर त्याला संघात फार संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
ICC explained WTC Final Scenario : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानी आहे. परंतु न्यूझीलंडविरूद्ध २-० च्या पराभवानंतर भारतचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्याचे अव्हान वाढले आहे. भारताचा न्यूझीलंडविरूद्ध शेवटचा सामना बाकी आहे. तर, नोव्हेंबरमध्ये भारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी या ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकावेच लागतील त्यामुळे भारताचे आव्हान अधिक अवघड झाले आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
Ballon d'Or Award Winners: दरवेळी दिग्गज लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो नामांकित होणाऱ्या बॅलन डी'ओर पुरस्कारचा यावेळी स्पेन आणि मँचेस्टर सिटी एफसी क्लबचा रोद्री मानकरी ठरला. अनेक आजी-माजी दिग्गज फुटबॉलपटूंच्या उपस्थितीत पॅरिसमध्ये २८ ऑक्टोबर रोजी ६८ वा मानाचा डी'ओर पुरस्कार देऊन रोद्री सन्मानित करण्यात आले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.