Sports Bulletin 7th November : रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये ओडिसाविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी ओडिसाच्या गोलंदाजांना तुफान झोडपले. ज्यामध्ये श्रेयस अय्यरने द्विशतकी खेळी केली. तर सिद्धेश लाड दीडशतक करून नाबाद राहीला. दिवसाअखेरीस मुंबईकडे ४५६ धावांची आघाडी आहे. तर, इंडियन प्रीमिअर लीगपाठोपाठ आता महिला प्रीमिअर लीगच्या फ्रॅंचायझींनींही रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..
Mumbai vs Odisha And Maharashtra vs Services: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा दुसरा दिवस श्रेयस अय्यर व सिद्धेश लाड या दोन मुंबईकरांनी गाजवला. श्रेयस अय्यरच्या द्विशतकी व सिद्धेश लाडच्या दीडशतकी खेळीच्या मदतीने मुंबई ओडिसाविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाअंती सामन्यात ४५६ धावांनी आघाडीवर आहे. तर, दुसरीकडे अंकित बावणेच्या नेतृत्वात दुसऱ्या दिवसाअंती महाराष्ट्र १२३ धावांनी पिछाडीवर गेला आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
Women’s Premier League Retention list : इंडियन प्रीमिअर लीगनंतर आता महिला प्रीमिअर लीगच्या फ्रॅंचायझींनी देखील संघात कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कर्णधार स्मृती मानधनाला ( Smriti Mandhana) कायम राखले आहे. तर मुंबईनेही कर्णधार हरमनप्रीत कौरला रिटेन केले आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
IND A vs AUS A: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ दुसऱ्या सामन्याला आजपासून सुरूवात झाली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताचा डाव ऑस्ट्रेलियाने अवघ्या १६१ धावांवर गुंडाळला. भारताच्या मुख्य संघातील लोकेश राहुल व ध्रुव जुरेलला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण केएल राहूल अवघ्या ४ धावा करून बाद झाला. तर,ध्रुव जुरेलने ८० धावांची खेळी करत भारतासाठी एकहाती खिंड लढवली. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
Virdhawal Khade: अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू विरधवल खाडे ( Virdhawal Khade) याच्यावर ग्रेटर मुंबई हौशी जलतरण संघटनेने ( GMAAA) एका वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे. मुंबई उपनगरातील एका जिमखान्यात विरधवल मागील दोन वर्षांपासून एका मुलीला प्रशिक्षण देत होता. विरधवलने या मुलीला काही अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप केला गेला आहे. मुलीच्या पालकांनी संघटनेकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई केली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.