Sports Calendar 2024 : २०२४ हे नववर्षही खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी भरपेट खेळांची मेजवानी देणारे ठरणार आहे. पुरुष व महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट आणि ऑलिंपिक या दोन स्पर्धा तर सर्वोच्च असणार आहेत. जूनमध्ये क्रिकेटचा हा धुमधडाका उडाल्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यात ऑलिंपिकचा बार उडणार आहे. त्याच्यासोबत टेनिसच्या चारही ग्रँडस्लॅम, डायमंड लीग आणि बॅडमिंटन या खेळांच्याही स्पर्धा असणार आहेत.
क्रिकेट वर्ल्डकप
गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट विश्वकरंडक भारतासाठी दूरच राहिलेला आहे. २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक थोडक्यात दूर राहिला होता. आता २०२४ मध्ये विश्वकरंडक उंचावण्याचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता असेल.
ऑलिंपिक
ऑलिंपिकमध्ये भारताचा आलेख उंचावतोय. टोकियो ऑलिंपिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात भारताने सात पदके मिळवली होती. या प्रसंगी भारताच्या पदकांची संख्या दहाच्या वर असावी, अशी अपेक्षा निश्चितच असेल.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा : दुसरी कसोटी ३ ते ७ जानेवारी.
अफगाणिस्तानचा भारत दौरा : ३ ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका (११ ते १७ जानेवारी).
इंग्लंडचा भारत दौरा : पाच कसोटी सामन्यांची मालिका (२५ जानेवारी ते ११ मार्च).
१९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा :
दक्षिण आफ्रिका (१७ जानेवारी ते ११ फेब्रुवारी).
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील तीन टी-२० सामने (५ ते ९ जानेवारी).
बॅडमिंटन : इंडियन ओपन नवी दिल्ली (१६ ते २१ जानेवारी). मलेशिया ओपन (९ ते १४ जानेवारी).
हॉकी : महिला ऑलिंपिक पात्रता हॉकी, रांची (१३ ते १९ जानेवारी).
टेनिस : ऑस्ट्रेलियन ओपन (१४ ते २८ जानेवारी).
फुटबॉल : आशिया कप, दोहा (१२ जानेवारी ते १० फेब्रुवारी).
मुंबई मॅरेथॉन : २१ जानेवारी.
इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील कसोटी सामने. महिला प्रीमियर लीग (आयपीएल).
वेटलिंफ्टिंग : आशियाई अजिंक्यपद, ३ ते १० फेब्रुवारी (सध्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर असलेल्या मीराबाई चानूसाठी महत्वाची स्पर्धा).
इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील कसोटी सामने.
आयपीएल (तारखा निश्चित व्हायच्या आहेत). लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यावर आयपीएलचा कार्यक्रम ठरवला जाईल.
बॅडमिंटन : ऑल इंग्लंड ओपन (१२ ते १७ मार्च).
गोल्फ : प्लेअर्स चॅम्पियन्सशिप (११ ते १७ मार्च).
वेटलिफ्टिंग : विश्वकरंडक अजिंक्यपद (३१ मार्च ते ११ एप्रिल). ऑलिंपिक पात्रता स्पर्धा असल्याने मीराबाईचे भवितव्य निश्चित होणार.
आयपीएल स्पर्धा.
अॅथलेटिक्स : डायमंड लीग (२० आणि २७ एप्रिल).
बॅडमिंटन : थॉमस आणि उबर कप (२८ एप्रिल ते ५ मे) २०२२ मध्ये भारताने थॉमस कप जिंकून इतिहास घडवला होता, त्यामुळे विजेतेपद राखण्याचे आव्हान.
गोल्फ : मास्टर्स स्पर्धा (८ ते १४ एप्रिल).
बॅडमिंटन : थॉमस आणि उबर कप कायम.
नेमबाजी : ऑलिंपिकसाठी पात्रता स्पर्धा (३ मे नवी दिल्ली आणि २३ मे भोपाळ). जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी अतिशय महत्त्वाची स्पर्धा.
टेनिस : फ्रेंच ओपन (२० मे ९ जून).
गोल्फ : पीजीए अजिंक्यपद (१३ ते १९ मे).
ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडीज-अमेरिका (४ ते ३० जून).
फुटबॉल : युरोपियन अजिंक्यपद ( १४ जून ते १४ जुलै).
कोपा अमेरिका : (२१ जून ते २१ जुलै).
बॅडमिंटन : इंडोनेशियन ओपन (४ ते ९ जून).
बांगलादेशचा भारत दौरा : २ कसोटी आणि ३ ट्वेन्टी-२० सामना (तारखा निश्चित व्हायचा आहेत).
महिला क्रिकेट : टी-२० विश्वकरंडक स्पर्धा.
अॅथलेटिक्स : डायमंड लीग फायनल्स, ब्रुसेल (१३-१४ सप्टेंबर).
मोटार स्पोर्टस् : मोटो जिपी २०-२२ सप्टेंबर).
बॅडमिंटन : चायना ओपन (१७ ते २२ सप्टेंबर).
महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक.
क्रिकेट : न्यूझीलंडचा भारत दौरा (३ कसोटी).
बॅडमिंटन : डेन्मार्क ओपन (१५ ते २० ऑक्टोबर).
क्रिकेट : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (५ कसोटी सामने). गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे मालिका विजय. गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणारा भारत एकमेव संघ
टेनिस : डब्ल्यूटीए फायनल्स (३ ते १० नोव्हेंबर). एटीपी फायनल्स (१० ते १७ नोव्हेंबर). बॅडमिंटन : सय्यद मौदी भारतीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा (२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर).
Dec 24 : क्रिकेट : भारताचे ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने.
महिला क्रिकेट : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (३ एकदिवसीय सामने).
वेस्ट इंडीज महिलांचा भारत दौरा (३ एकदिवसीय आणि ३ ट्वेन्टी-२०).
बॅडमिंटन : बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स (११ ते १५ डिसेंबर).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.