Naveen Ul Haq and Virat Kohli: IPL 2023 मध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील मैदानावर झालेला वाद संपूर्ण देशाने पाहिला होता. त्यानंतर त्यांच्यातील वादावर लोकांकडून प्रतिक्रिया देखील दिल्या जात होत्या. 01 मे 2023 रोजी LSG आणि RCB यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा अफगाण वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि RCBचा विराट कोहली यांच्यात शब्दयुद्ध पाहायला मिळाले.
या सामन्यानंतर काही दिवसांनी नवीनने सोशल मीडियावर स्वीट मँगोची एक स्टोरी शेअर केली, ज्याच्या संबंध लोकांनी थेट विराट कोहलीशी जोडला.
आता नवीन उल हक यांनी या स्टोरीबाबत खुलासा केला आहे. नवीनने ही इंस्टाग्राम स्टोरी विराटसोबतच्या वादानंतर काही दिवसांनी पोस्ट केली होती, जेव्हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला आरसीबीचा विराट कोहली पहिल्याच षटकातच बाद झाला होता, त्यानंतर नवीनने सोशल मीडियावर 'स्वीट मँगो'ची स्टोरी शेअर केली.
आता नवीनने या स्टोरीबद्दल सांगितले की, विराट कोहलीचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. लखनऊ सुपर जायंट्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवीन म्हणाला की, “मला तीन-चार दिवसांपासून आंबा खायची इच्छा होती. मी धवल भाई (एलएसजी टीम लॉजिस्टिक) यांना सांगितले की मला आंबे खायचे आहेत आणि त्या रात्री त्यांनी स्वतः आंबे आणले. तर मी स्क्रीनसमोर बसून आंबा खात होतो. स्क्रीनवर मुंबई इंडियन्सचा एक खेळाडूचा फोटो होता. मी नुकतेच 'स्वीट मॅंगो' लिहिलं आणि लोकांनी त्याचा अर्थ काहीतरी वेगळा केला.(Latest Marathi News)
एकदिवसीय विश्वचषकात कोहली-नवीनचे पॅचअप
नुकत्याच झालेल्या 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली आणि नवीन उल यांचा वाजद मिटला, अशी चिन्ह दिसली. या स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी मैदानावर हस्तांदोलन करुन वाद मिटवला. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.