Ishan Kishan India Vs Australia: विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अवघा एक सामना खेळण्याची संधी मिळाली असली तरी संपूर्ण स्पर्धेत मी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नेटमध्ये कसून सराव करत होतो. त्याचा फायदा मला कालच्या पहिल्या सामन्यात झाला, असे मत ईशान किशनने व्यक्त केले.
विश्वकरंडक स्पर्धेत ठराविक गोलंदाजांचा कसा सामना करायचा याचे धडे मी मिळवत होतो. स्वतःच्या नेटमधील सरावाच्या वेळी मला प्रशिक्षकांकडून काही टिप्स मिळत होत्या त्याचा उपयोग मला झाला असे ईशानने सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ईशानने तन्वीर संघा याच्यावर हल्ला केल्या त्याच्या १० चेंडूत ३० धावां फटकावल्या.
विश्वकरंडक स्पर्धेत मला अंतिम संघात संधी मिळणार नाही हे निश्चित होते, परंतु नेटमधील सरावाच्या वेळी, आपल्यासाठी आत्ता काय महत्वाचे आहे आणि आपण काय करु शकतो, असा प्रश्न मी स्वतःलाच प्रश्न विचारायचो. नेटमध्ये जेवढी संधी मिळेल तेवढा सराव करायचा हे ठरवले होते. त्यावेळी मी सर्व प्रशिक्षकांशी चर्चाही करायचो, असे ईशानने सांगितले.
तन्वीर संघा या लेगस्पिनर गोलंदाजाला टार्गेट करण्याबाबत विचारले असता ईशान म्हणाला. मी २० षटके यष्टीरक्षण केल्यानंतर खेळपट्टी कशी आहे याची मला जाणीव झाली होती. जेव्हा २०९ धावांचे आव्हान गाठायचे असते तेव्हा एक-दोन गोलंदाजांवर ठरवून हल्ला करायचा असतो. मी संघा याला टार्गेट करतो असे सूर्यकुमारला सांगितले कारण त्यावेळी आम्हाला प्रत्येक चेंडूवर धाव मिळवणे आवश्यक होते. या हल्यामुळे पुढचे आव्हान अवाक्यात आले.(Latest Marathi News)
अखेरच्या षटकांत फलंदाजीस येणाऱ्या फलंदाजांसाठी अधिक धावांचे दडपण ठेवायचे नसते त्यामुळे डावाच्या मध्यावर शक्य तेवढ्या धावा करणे गरजेचो होते, माझा स्वतःवर विश्वास होता त्यामुळे मी धोका स्वीकारून फटकेबाजी केली, असेही ईशान म्हणाला.
आम्ही पहिले दोन फलंदाज लवकर गमावले होते त्यामुळे भागीदारी होणे गरजेचे होते. आयपीएलमध्ये मी सूर्यकुमारबरोबर बरेच सामने खेळलेलो आहे त्यामुळे तो कसा खेळतो आणि कोणते फटके मारतो याची मला कल्पना होता. आम्ही सातत्याने चर्चा करुन प्रत्येक षटकासाठी रणनिती तयार करत होतो, असे ईशानने सांगितले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.