Union Budget 2024: खेलो इंडियावर भर पण निधीत वाढ नाहीच..! क्रीडा क्षेत्रासाठी किती कोटींची तरतूद?

Sports Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा विभागाच्या निधीमध्ये फारशी वाढ करण्यात आलेली नाही.
Union Budget | Sports
Union Budget | SportsSakal
Updated on

Union Budget 2024: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानुसार क्रीडा विभागाच्या निधीमध्ये फारशी वाढ करण्यात आले नाही. पण खेलो इंडिया प्रकल्पावर सर्वाधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.

निर्मला सीतारामन यांनी 2024-25 साठी क्रीडा क्षेत्रासाठी 3,442.32 कोटींचा निधी जाहीर केला आहे. यातील 900 कोटी रुपयांची तरतूद ही तळागाळातील खेळाला प्रोस्ताहन देण्यासाठी असलेल्या खेलो इंडिया प्रकल्पासाठी करण्यात आली आहे.

Union Budget | Sports
Union Budget: जाणून घ्या, अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? अन् तयारी कोण करते?

गेल्या अर्थसंकल्पावेळी खेलो इंडियासाठी 880 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला, यावेळी त्यात 20 कोटींची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, 26 जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक सुरू होत आहे. तसेच अद्याप राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना दोन वर्षांचा कालावधी आहे. अशात यंदा गेल्यावर्षीपेक्षा केवळ 45.36 कोटींची वाढ क्रीडा निधीमध्ये करण्यात आली आहे. 2023-24 साठी 3397.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

साल 2018 पासून सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया प्रकल्पासाठी सरकारकडून सातत्याने त्याच्या विस्ताराचा प्रयत्न सुरू आहेत. 2023 मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्सदेखील सुरू करण्यात आले.

Union Budget | Sports
Union Budget Session 2024: एनडीएच्या अर्थसंकल्पात काय होणार स्वस्त? काय महागणार?

दरम्यान, 2024-25 च्या क्रीडा निधीमधील 340 कोटी रुपये नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनला मंजूर करण्यात आले आहेत. गेल्यावेळीपेक्षा यात 15 कोटींची वाढ झाली आह. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाला यंदा 822.60 कोटीं रुपये मंजूर झाले आहेत.

याशिवाय नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) आणि नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी (NDTL) यांनी त्यांच्या बजेटमध्येही किंचित वाढ झाली असून आता नाडाला 21.73 कोटी, तर एनडीटीएलला 22 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.