PCB Mohammad Hafeez : मोहम्मद हाफीजचे दिवस संपले? क्रीडा मंत्रालयानेच छाटले पंख

PCB Mohammad Hafeez
PCB Mohammad Hafeez esakal
Updated on

PCB Mohammad Hafeez : पाकिस्तानच्या क्रीडा मंत्रालयाने पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मोहम्मद हाफीज यांचे पंख छाटण्यास सुरूवात केली आहे. मोहम्मद हाफीज वनडे वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा संचालक झाला होता. त्यानंतर आता पीसीबीने हाफीजचा करार वाढवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडे कराराची प्रत पाठवली होती.

मात्र एका खात्रीलायक सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार 'हाफीजचा करार हा लाँग टर्मसाठी होता. मात्र बोर्डाला सांगण्यात आलं की हाफीजचा करार हा शॉर्ट टर्मसाठी करा हा करार न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेनंतर संपणार आहे.'

PCB Mohammad Hafeez
Shivam Dube Vs Hardik Pandya : टी 20 वर्ल्डकप संघात शिवम की हार्दिक... जहीर खानने वर्तवला धक्कादायक अंदाज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफीज सोबतच दुसरा नवीन कोचिंग स्टाफ हा दीर्घकालीन करार करण्याच्या अटीवरच पीसीबीशी जोडले गेले होते. मात्र आता असं दिसतंय की हाफीजचा करार तरी दीर्घकालीन असण्याची शक्यात दिसत नाहीये. हाफीज आणि इतर प्रशिक्षक आल्यापासून संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व कसोटी सामने हरले. त्यानंतर आता न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 मालिकेत देखील आतपर्यंतचे सर्व सामने गमावले आहेत.

हाफीजची पाकिस्तान संघाचा संचालक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर उमर गुल, सईद अजमल आणि सिमॉन हेलमॉट आणि अॅडम होलिओके यांची नियुक्ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केली होती. न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू यासिर अराफातने हेलमॉट यांनी रिप्लेस केलं.

PCB Mohammad Hafeez
Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टरने ठोकल्या 168 च्या स्ट्राईक रेटने धावा; युवराजच्या संघाला दिली शेवटच्या षटकात मात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.