Sports News : रोहिणी भवरला खो- खो फेडरेशन ऑफ इंडियाची शिष्यवृत्ती जाहीर

Sports News
Sports Newsesakal
Updated on

नाशिक : फलटण येथे झालेल्या किशोर/ किशोर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील गुणी आणि होतकरू खेळाडूंसाठी खो- खो फेडरेशन ऑफ इंडियाने शिष्यवृत्ती देण्यात येईल असे स्पर्धे दरम्यान जाहीर केले होते. त्या नुसार प्रत्यक्ष मैदानातील कामगिरीच्या आधारे त्यांनी सुवर्ण पदक विजेत्या महाराष्ट्राच्या किशोरी संघातील सहा खेळाडूंना शिष्यवृत्ती जाहीर केली. त्यात नाशिकच्या 'संस्कृती' नाशिकची खेळाडू रोहिणी भवर हिची निवड करण्यात आली आहे.

Sports News
Nashik Sports News : राज्याच्या मुलींच्या Kho -Kho संघात नाशिकच्या 3 खेळाडूंची निवड

ती सकाळ- सायंकाळ करते सराव

भारतीय विमान प्राधिकरण तर्फे या आधी वृषाली भोये आणि कौसल्या पवार यांच्या नंतर शिष्यवृत्ती मिळवणारी रोहिणी ही शिष्यवृत्ती मिळवणारी 'संस्कृती' नशिकची तिसरी खेळाडू आहे. तिला गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांचे मार्गदर्शना खाली ती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सकाळ- सायंकाळ सराव करत असते.

Sports News
Sports Year Ender 2022 : आंदोलनांनी गाजवलं खेळाचं मैदान

तिच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड आणि सर्व पदाधिकारी यांनी रोहिणीचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.