Sports News : रिक्षा चालकाच्या मुलीची सुवर्ण कामगिरी; स्विमींगमध्ये देशाला मिळवून दिलं 'गोल्ड'

Sports News
Sports News
Updated on

मुंबई - चेंबूरमधील प्रसिध्दी कांबळे हिने सध्या बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून भारताला 'गोल्ड मेडल' मिळवून दिले आहे. या कामगीरीमुळे प्रसिध्दीचे व तिच्या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या घरची परिस्थिती हलाकीची असून वडील ऑटो रिक्षा चालवतात. तर आई घरकाम करते. चेंबूरमधील रहिवाशांनी या कामगीरीसाठी तिचा भव्य सत्कार करीत मिरवणूक काढली.

Sports News
Mumbai : मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात; तलावांत २६ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

चेंबुरमधील पंचशील नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहणारी प्रकाश आणि सुषमा कांबळे यांच्या मुलीने देशाचे नाव मोठे केले आहे. कांबळे कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती जेमतेम त्यामुळे आपल्या मुलीला नेहमीच्या शाळेत शिक्षण देणे त्यांना परवडत नव्हते.

त्यामुळे वडिलांनी तिला स्पेशल सुलभा शाळेत दाखल केले. मात्र शाळेतील क्रीडा शिक्षक सुनील आडे व प्रिन्सिपल अनुराधा जठार यांनी प्रसिध्दी हिची खेळातली आवड पाहून तिला स्विमींगची प्रॅक्टीस करवून घेतली.

आपल्या मुलीची आवड पाहून वडिलांनी पदरमोड करत प्रसिध्दीला घाटकोपर येथील ओडियन तरण तलाव व नंतर चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य तरण तलावात स्विमिंगच्या प्रशिक्षणासाठी घेऊन जात होते. याचा सर्व खर्च वडील व शाळा करीत होती. पोहण्यातील तीची प्रगती बघून क्रिडा शिक्षक आणि प्राचार्यांनी तिला बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिम्पिक भाग घेण्याकरिता तयारी करून घेतली घेतली.

Sports News
Maha Electric Vehicle Policy: इलेक्ट्रिक वाहनांबाबतचं धोरण शिंदे सरकारनं बदललं; आदित्य ठाकरे संतापले

बर्लिन इथल्या स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेसाठी प्रसिध्दीची निवड झाली. २१ जून रोजी पार पडलेल्या स्पेशल ऑलिंपिक स्विमिंग स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात 25 मीटर फ्रीस्टाइल मध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यामध्ये शाळेचा वाटा आणि आई-वडीलांची मेहनत असल्याचे ती सांगते

सरकारने तिला पुढील वाटचाली करिता मदत करण्याची आशा तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. तर देशासाठी गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकल्याचा मला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रीया प्रसिद्दी कांबळे हीने सकाळकडे व्यक्त केली आहे.

स्पेशल ऑलम्पिक

जर्मनीच्या बर्लीन इथे १७ ते २५ जूनदरम्यान विशेष ऑलम्पिक स्पर्धा भरल्या होत्या. यात २६ क्रीडा प्रकारात १९० देशांतील ७ हजर खेळाडूंनी भाग घेतला होता. विशेष खेळाडूंसाठी ३ हजार प्रसिक्षक आणि २० हजार स्वयंसेवक हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.