Sl vs Pak Babar Azam: गजब बेइज्जती! श्रीलंकेने बाबरचा केला पोपट, आधी केला अपमान अन् नंतर...

sri lanka apologizes on babar azam
sri lanka apologizes on babar azamsakal
Updated on

Sri Lanka vs Pakistan Test Babar Azam : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान गाले येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात बाबर अँड कंपनीने चार विकेट राखून विजय मिळवला. मॅचनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान असे काही दिसले, ज्यानंतर लोक पाक टीमची खिल्ली उडवत आहेत.

सोशल मीडियावर मीम्स बनवून लोकांनी खूप एन्जॉय केले. जेव्हा वाद वाढला तेव्हा श्रीलंकेच्या बोर्डाला आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी एक निवेदन जारी करून बाबर आझम आणि पाकिस्तानची माफी मागितली.

sri lanka apologizes on babar azam
Asia Cup 2023 : 'स्पर्धेदरम्यानच्या प्रवासामुळे...' बांगलादेश बोर्ड आशिया चषकाच्या वेळापत्रकावर नाराज

सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये बाबर आझम सामना विजेत्याचा चेक घेण्यासाठी आला आणि त्याने कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. काही वेळाने बाबरचा चेकसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी एसएलसीची मोठी चूक पकडली होती. बाबर आझमला देण्यात आलेल्या धनादेशावर दोन वेगवेगळ्या रकमा छापण्यात आल्या होत्या. चेकमध्ये US$5,000 आकड्यांमध्ये होते, तर शब्दात फक्त US$2,000 लिहिले होते.

श्रीलंका क्रिकेटने त्रुटीबद्दल स्पष्टीकरण जारी केले आणि सांगितले की, श्रीलंका क्रिकेट (SLC) कळवू इच्छिते की श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील नुकत्याच संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजेत्याला बक्षीस रक्कम US$ 5000 आहे. सामन्यातील विजेत्याला देण्यात आलेल्या 'प्रेझेंटेशन चेक'मधील चुकीबद्दल माफी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.