कसोटी मालिकेच्या मध्यावर संघाला मोठा धक्का! 'या' स्टार खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे दरम्यान...
Sri Lanka Batsmen lahiru thirimanne
Sri Lanka Batsmen lahiru thirimanne
Updated on

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे तिसरे चक्र सुरू झाले आहे. जवळपास सर्वच संघ कसोटी मालिका खेळत आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकाही खेळली जात आहे. त्याचबरोबर श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघही आपापसात कसोटी मालिका खेळत आहेत.

दरम्यान, एका स्टार खेळाडूने आपल्या संघाला मोठा धक्का दिला आहे. या खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एकेकाळी या खेळाडूने आपल्या संघाचे नेतृत्वही केले होते.

Sri Lanka Batsmen lahiru thirimanne
Harmanpreet Kaur : भारतीय कर्णधार हरमनप्रीतसोबत बांगलादेशात झाला 'अन्याय', आता BCCI काय घेणार निर्णय?

श्रीलंकेच्या एका खेळाडूने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. श्रीलंकेचा स्टार खेळाडू लाहिरू थिरिमाने याने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 12 वर्षांच्या कारकिर्दीत श्रीलंकेच्या फलंदाजाने बरीच ओळख मिळवली. या डावखुऱ्या फलंदाजाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा प्रवास झाला असून श्रीलंकेच्या संघासाठी त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. वर्षानुवर्षे सर्व संधी दिल्याबद्दल त्याने आपल्या देशाचे आभार मानले.

Sri Lanka Batsmen lahiru thirimanne
WI vs IND 2nd Test : तीन सत्रात फक्त चार विकेट; विंडीजने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले

लाहिरू थिरिमाने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या काही वर्षांपासून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत या खेळाने मला खूप काही दिले आहे. पण खूप भावनांच्या भरात मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा करण्यासाठी येथे आलो आहे. एक खेळाडू म्हणून मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत, मी खेळाचा आदर केला आहे आणि मी माझ्या मातृभूमीसाठी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने केले आहे. हा निर्णय घेणे कठीण होते, परंतु हा निर्णय घेण्यास माझ्यावर स्वेच्छेने किंवा अनिच्छेने प्रभाव टाकणाऱ्या अनेक घटकांची मी येथे गणना करू शकत नाही.

Sri Lanka Batsmen lahiru thirimanne
IND vs PAK Final: भारत-पाकिस्तानमध्ये आशिया कप फायनलचा थरार! कोण बनेल चॅम्पियन? कधी अन् कुठे पहायचा सामना

लाहिरू थिरिमाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंकेच्या फलंदाजाने 44 कसोटी सामने खेळले आहेत आणि 26.4 च्या सरासरीने एकूण 2088 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि दहा अर्धशतकांचा समावेश आहे. थिरिमानेने श्रीलंकेसाठी 127 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 4 शतके आणि 21 अर्धशतकांसह 34.7 च्या सरासरीने 3194 धावा केल्या. लाहिरूने 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 291 धावा केल्या. एकेकाळी त्याने श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्वही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.