Sri Lanka Cricket Jayasuriya : एका वर्षाचा करार! श्रीलंका क्रिकेट बोर्डानं सनथ जयसुर्याकडे दिली मोठी जबाबदारी

Sri Lanka Cricket Jayasuriya
Sri Lanka Cricket Jayasuriya esakal
Updated on

Sri Lanka Cricket Jayasuriya : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार सनथ जयसुर्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सनथ जयसुर्याची पूर्णवेळ क्रिकेट सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. जयसुर्यासोबतचा करार हा 12 महिन्यांचा असणार आहे.

क्रिकेट सल्लागार म्हणून खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं हे जयसुर्याचं मुख्य काम असणार आहे. श्रीलंकेने गुरूवारी याबाबतचं वक्तव्य प्रसिद्ध केलं. 54 वर्षाचा जयसुर्या हा क्रिकेट सल्लागार म्हणून लगेचच काम सुरू करणार आहे.

Sri Lanka Cricket Jayasuriya
Surya Kumar Yadav : दुखापत फार गंभीर दिसत... सूर्यकुमार यादवच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानुसार, 'जयसुर्याचे क्रिकेट सल्लागार म्हणून प्रमुख काम हे श्रीलंका क्रिकेट राष्ट्रीय कार्यक्रम हा व्यावसायिकतेचा सर्वच्च स्तर कसा गाठू शकले हे पाहणे आणि खेळाडू आणि कोचिंग स्टाफ हे त्यांची सर्वोच्च कामगिरी कशी करतील हे पाहणे आहे.'

'तो सर्व संघाना लागणाऱ्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासंदर्भातील गोष्टी पाहणार आहे. याचबरोबर वैयक्तिक खेळाडूच्या प्रगती आणि कौशल्य विकासावरही तो रणनिती तयार करणार आहे. तो राष्ट्रीय विशेष कौशल्य कार्यक्रम देखील तयार करेल.'

Sri Lanka Cricket Jayasuriya
MS Dhoni Jersey No 7 : बीसीसीआयचा धोनीच्या जर्सी क्रमांक 7 बाबत मोठा निर्णय; खेळाडूंना दिली सुचना

सनथ जयसुर्याने 110 कसोटी सामन्यात 14 शतके तर 470 वनडे सामन्यात 28 शतके ठोकली आहेत. त्याने श्रीलंका क्रिकेटची जवळपास 20 वर्षे सेवा केली. त्याने डावखुरा फिरकी गोलंदाजी करत श्रीलंकेसाठी 400 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.