Sri Lanka Cricket Crisis : श्रीलंकेच्या वादग्रस्त क्रीडा मंत्र्याचीच खुर्ची गेली; राष्ट्रपतींवरच हत्येच्या कटाचा केला होता आरोप

श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्याचीच खुर्ची गेली; राष्ट्रपतींवरच हत्येच्या कटाचा केला होता आरोप
Sri Lanka Cricket Crisis
Sri Lanka Cricket Crisisesakal
Updated on

Sri Lanka Cricket Crisis : श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.रोशन यांनी क्रिकेट बोर्डातील भ्रष्टाचार संपल्यामुळे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे माझी हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आलं.

Sri Lanka Cricket Crisis
Rohit Sharma : इस मोड से जातें हैं.... रोहित शर्मा सोशल मीडियावर परतला मात्र 'या' फोटोचा अर्थ काय?

श्रीलंका सरकारमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, रोशन रानासिंघे यांना आठवड्याच्या कॅबिनेट बैठकीपूर्वीच पदावरून हटवण्यात आलं. रोशन यांनी जर त्यांची हत्या झाली तर राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांना जबाबदार धरण्यात यावं अस वक्तव्य केलं होत.

ते म्हणाले होते की, 'क्रिकेट बोर्डातील भ्रष्टाचार संपवल्यानंतर माझी हत्या होईल अशी मला भीती आहे. रानासिंघे यांनी संसदेत सांगितले की श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवण्यावरून विक्रमसिंघे यांच्यासोबत माझे टोकाचे मतभेद झाले. जर माझी रस्त्यात हत्या झाली तर राष्ट्रपती आणि चिफ ऑफ स्टाफ याला जबाबदार असतील.'

या वक्तव्यानंतर विक्रमसिंंघे यांच्याकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून क्रीडा मंत्र्यांची उचलबांगडी केल्याचे सांगण्यात आले.

Sri Lanka Cricket Crisis
Sri Lanka Cricket Crisis : श्रीलंकेच्या वादग्रस्त क्रीडा मंत्र्याचीच खुर्ची गेली; राष्ट्रपतींवरच हत्येच्या कटाचा केला होता आरोप

माजी क्रीडामंत्री रानासिंघे यांनी या महिन्यातच भ्रष्टाचाराचे आरोप करत संपूर्ण श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बर्खास्त केलं होतं.

श्रीलंकन क्रिकेट बोर्ड ही दिवळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेतील सर्वात श्रीमंत संस्था आहे. या बोर्डात सरकारचा हस्तक्षेप झाल्यानंतर आयसीसीने त्वरित पावले उचलत श्रीलंका क्रिकेटवर बंदी घातली होती.

दरम्यान, राष्ट्रपतींनी श्रीलंकन क्रिकेट बोर्डावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यास सांगितले होते. मात्र क्रीडामंत्री रोशन रानासिंघे यांनी त्यास नकार दिला. श्रीलंकन संसदेने क्रीडा मंत्र्यांना पाठिंबा देणारा ठराव देखील पास केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.