IPL 2023: श्रीलंकेचे खेळाडू IPLमध्ये नाहीत खेळणार? बीसीसीआयने घेतला हा निर्णय

भारतात आयपीएलच्या क्रिकेट उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत आणि त्यात आता...
IPL 2023
IPL 2023sakal
Updated on

IPL 2023 : भारतात आयपीएलच्या क्रिकेट उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च पासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. त्याआधी श्रीलंका क्रिकेटने मोठा खुलासा केला आहे. आयपीएल लिलावात त्याच्या एकाही क्रिकेटपटूवर बंदी घातली जाणार नाही.

खरं तर गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये काही श्रीलंकेचे खेळाडू उपलब्ध होणार नाहीत, त्यामुळे बीसीसीआय नाराज आहे आणि आयपीएल लिलावात त्या श्रीलंकन ​​क्रिकेटपटूंवर बंदी घालू शकते. श्रीलंका क्रिकेटने मीडियामध्ये सुरू असलेल्या या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे.

IPL 2023
IPL: 2013 मध्ये एका विजयासाठी रडत होती मुंबई... रोहितने कर्णधारपदाची धुरा संभाळली अन्...

आयपीएल 2023 मध्ये 4 श्रीलंकेचे क्रिकेटर खेळणार आहेत. त्यापैकी तीन श्रीलंकेचे क्रिकेटपटू वानिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), महिश तेक्षाना आणि मथिशा पाथिराना (दोन्ही चेन्नई सुपर किंग्ज) हे लगेचच त्यांच्या देशासाठी सामने खेळण्यात व्यस्त आहेत. यामुळे ते आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत.

श्रीलंका सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून ते टी-20 मालिकेत व्यस्त आहेत. 8 एप्रिलला श्रीलंका न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यातील शेवटचा टी-20 सामना खेळणार आहे. त्यानंतरच श्रीलंकेचे खेळाडू आयपीएलमध्ये येऊन खेळू शकतील. या तिघांव्यतिरिक्त एक खेळाडू भानुका राजपक्षे आहे, जो पंजाब किंग्जकडून खेळणार आहे, तो संपूर्ण आयपीएल हंगामासाठी उपलब्ध आहे.

IPL 2023
IPL 2023: धोनी-धोनी... अंगावर काटा आणणारा व्हिडिओ, CSKच्या सराव सत्रात माहीला पाहण्यासाठी जमलेली गर्दी

श्रीलंकन ​​मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय श्रीलंकन ​​खेळाडूंच्या या वृत्तीवर खूश नाही. आता श्रीलंकेच्या एका नवीन वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेटने आपल्या आयपीएल स्टार्सना एनओसी जारी केले आहे आणि बीसीसीआयला त्यावर कोणताही आक्षेप नाही.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आमच्या खेळाडूंना न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर आयपीएलमध्ये जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी केले आहे. श्रीलंका क्रिकेटच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये श्रीलंकन ​​क्रिकेटपटूंच्या अनुपलब्धतेवर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही.

IPL 2023
IPL LIVE Streaming: हॉटस्टारवर नाही दिसणार IPLचे सामने! मोबाइलवर कुठे पाहू शकता

दक्षिण आफ्रिकन संघाचे काही खेळाडू आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना देखील चुकवू शकतात, कारण हा संघ 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत 2 वनडे मालिकेसाठी नेदरलँड्सचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक, एनरिक नोर्टजे, लुंगी एनगिडी हे आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये उपलब्ध होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.