SL vs NED T20 World Cup 2022 : अखेर लंका विजयी! नेदरलँडला मात देत बनली ग्रुपमधील 'टॉपर'

Sri Lanka Defeat Netherlands in T20 World Cup Qualifier Reached In Top Spot Of Group A
Sri Lanka Defeat Netherlands in T20 World Cup Qualifier Reached In Top Spot Of Group A esakal
Updated on

SL vs NED T20 World Cup 2022 : श्रीलंकेने टी 20 वर्ल्डकप 2022 पात्रता फेरीच्या आपल्या अंतिम सामन्यात नेदरलँडचा 16 धावांनी पराभव केला. प्रथम फंलदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 162 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना नेदरलँडने मॅक्स ओडोव्हडच्या नाबाद 71 धावांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 3 तर महीश तिश्राणाने 2 बळी टिपले. तर फलंदाजीत कुसल मेंडीसने 44 चेंडूत 79 धावांची धडाकेबाज खेळी केली.

या विजयाबरोबरच श्रीलंका पात्रता फेरीच्या ग्रुप A मध्ये चार गुण मिळवत रनरेटच्या आधारे अव्वल स्थानावर पोहचली आहे. मात्र नामिबिया अजूनही लंकेला पॉईंट टेबलमध्ये खाली खेचू शकते. आज दुपारी होणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीविरूद्धच्या सामन्यात जर नामिबियाने विजय मिळवला तर ते ग्रुप टॉप करतील. कारण श्रीलंकेचे नेट रनरेट हे +0.667 आहे. तर नामिबियाचे रनरेट +1.277 इतके आहे. जर नामिबियाने युएईला मात दिली तर ते ग्रुप टॉप करतील आणि श्रीलंका दुसऱ्या स्थानावर पोहचेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघ सुपर 12 साठी पात्र होतील.

Sri Lanka Defeat Netherlands in T20 World Cup Qualifier Reached In Top Spot Of Group A
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये थैमान घालणाऱ्या खेळाडूचा मोडला पाय, टीम इंडियाचं स्वप्न लांबलं

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 36 धावांवर दोन धक्के बसले होते. मात्र सलामीवीर कुसल मेंडिसने असलंकासोबत तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत संघाला शंभरीच्या जवळ पोहचवले. असलंका 30 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षे 19 धावांची भर घालून माघारी परतला. शनका देखील 8 धावा करून बाद झाला. मात्र सलामीवीर मेंडिसने एकाकी झुंज देत लंकेला 150 च्या पार पोहचवले. अखेर तो शेवटच्या षटकात 44 चेंडूत 79 धावांची खेळी करून बाद झाला. श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली.

Sri Lanka Defeat Netherlands in T20 World Cup Qualifier Reached In Top Spot Of Group A
Ind vs Pak : पाकिस्तानचं पितळ उघडं पडलंय! या कारणांमुळे भारताविरुद्ध पराभव पक्का

दरम्यान, श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले 163 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नेदरलँडची सुरूवात खराब झाली. त्यांनी पॉवर प्लेमध्येच 2 फलंदाज गमावले. नेदरलँडचा सलामीवीर मॅक्स ओडोव्हडने एक बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ लाभली नाही. मॅक्स व्यतिरिक्त बास दे लीड्स (14), टॉम कूपर (16) आणि स्कॉट एडवर्ड्स (21) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दुसरीकडे मॅक्सने शेवटच्या चेंडूपर्यंत किल्ला लढवत 53 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 3 तर महीश तिक्षाणाने 2 विकेट्स घेतल्या. नेदरलँडकडून वॅन मीकेरेन आणि बास दे लीड्स यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.