ICC Mens T20 World Cup 2021 : युएई आणि ओमानमध्ये रंगणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या 15 सदस्यीय संघाच्या नेतृत्वाची धूरा दासुन शनाका याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. श्रीलंका 18 ऑक्टोबर रोजी नामीबिया विरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करेल. ग्रुप एमधील त्यांची ही लढत आबू-धाबीच्या मैदानात खेळवण्यात येईल.
श्रीलंकेच्या संघात निरोशन डिक्वेला, कुसल मेंडिस आणि दनुष्का गुणथिलाका यांचाही समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यावर कोरोना प्रोटोकॉलच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. एका वर्षांची बंदी घालण्यात आलेल्या या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापतीतून सावरणाऱ्या कुसल परेराला संघात स्थान देण्यात आले असून त्याच्या गैरहजरीत विकेटमागची जबाबदारी सांभाळणाऱ्या मिनोड भानुकाला डच्चू देण्यात आलाय.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातून पदार्पण करणाऱ्या 21 वर्षीय महेश थेक्षाना याचीही संघात वर्णी लागली आहे. फिरकीपटूने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 4 विकेट घेऊन निवड समितीचे लक्ष वेधले होते. श्रीलंकेच्या ताफ्यात डावखुरा फिरकीपटू प्रवीण जयविक्रमा आणि वानिंदु हसरंगा यांनाही संधी मिळाली आहे.
जयविक्रमा श्रीलंका ताफ्यातील एकमेव अनकॅप्ड सदस्य आहे. टी-20 तो पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मालिकेत त्याने 11 विकेट घेतल्या होत्या. आतापर्यंत खेळलेल्या पाच वनडे सामन्यात त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावरच त्याला टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे.
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्वा, कुसल जनीथ परेरा, दिनेश चांडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चरित असलंका, वानिंदु हसरंगा, कामिन्दु मेंडिस, चमिका करुणारत्ने, नुवान प्रदीप, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, प्रवीण जयविक्रमा, एम दीक्षाना.
राखीव : लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजया, पुलिना थरंगा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.