SLvsIND : सूर्यासमोर श्रीलंकन बॉलरचा पोपट; व्हिडिओ एकदा पाहाच!

या तिघांशिवाय अन्य कोणालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही.
SLvsIND
SLvsIND Twitter
Updated on

Sri Lanka vs India, 3rd ODI : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) संघासाठी उपयुक्त खेळी केली. त्याने 37 चेंडूत केलेल्या 40 धावांच्या जोरावर भारतीय संघाला 200 + धावा करणे शक्य झाले. त्याच्याशिवाय पहिल्यांदाच संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनने (Sanju Samson) 46 चेंडूत 46 धावा आणि सलामीवीर पृथ्वी शॉने 49 धावांची खेळी केली. या तिघांशिवाय अन्य कोणालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

भारतीय डावात सूर्यकुमार यादव खेळत असतानाचा घडलेल्या घटनेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. भारतीय डावातील 23 व्या षटकात प्रवीण जयविक्रमाच्या (Praveen Jayawickrama) गोलंदाजीव स्वीप फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार फसला. चेंडू पॅडवर आदळल्यानंतर जय विक्रमाने जोरदार अपिल केली. मैदानातील पंच कुमार धर्मसेना यांनी गोलंदाजाच्या बाजूने निर्णय देत सूर्याला आउट दिले.

SLvsIND
Olympics Ceremony : निर्बंधातही उत्साह दर्शवणारे खास क्षण

त्यानंतर सूर्यकुमार यादवने रिव्ह्यू घेतला. रिप्लायमध्ये चेंडू लेग स्टंपवर जात असल्याचे दिसत असल्यामुळे श्रीलंकन खेळाडूंनी सूर्याच्या विकेटचा आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण थर्ड अंपायरच्या निर्णयाने सूर्याचा रिव्ह्यू सार्थ ठरला. श्रीलंकन खेळाडूंचा आनंद काही क्षणातच होत्याचा नव्हता झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्रीलंकन खेळाडूंचा जणू पोपटच झाला अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.

SLvsIND
SL vs IND : श्रीलंकेसमोर 227 धावांचे टार्गेट

चाहत्यांना या व्हिडिओमधून आनंद मिळाला एवढेच काही या सामन्यात भारताच्या बाजूने घडले. सूर्याला या संधीच मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. धनंजय डी सिल्वाने त्याला पायचित केले. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात पावसाने व्यत्यय आल्याने सामना प्रत्येकी 47-47 षटकांचा करण्यात आला. भारतीय संघाला एवढी षटकेही खेळता आली नाहीत. भारतीय संघाचा डाव 43.1 षटकात 225 धावांतच आटोपला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.