SL vs IND : फर्नांडोचा अविष्कार! अखेर लंका जिंकली

भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Avishka Fernando
Avishka FernandoTwitter
Updated on

Sri Lanka vs India, 3rd ODI : सलामीवीर अविष्का फर्नांडोच्या 76 धावा आणि मध्यफळीत भानूका राजपक्षाने अर्धशतकी खेळी 65 (56) करत त्याला दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर अखेर श्रीलंकेला विजय मिळाला. टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यातील पराभवामुळे तीन सामन्यांची वनडे मालिका श्रीलंकेने यापूर्वीच गमावली होती. पण या विजयामुळे टी-20 मालिकेपूर्वी त्यांना थोडा आत्मविश्वास नक्कीच येईल. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (Sri Lanka vs India 3rd ODI Avishka Fernando and Bhanuka Rajapaksa Fifty Sri Lanka won by 3 wkts)

पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 47-47 षटकांच्या सामन्यात टीम इंडियाने 43.1 सर्व बाद षटकात 225 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेला 227 धावांचे टार्गेट मिळाले होते. श्रीलंकेनं 4 गडी राखून या सामन्यात विजय नोंदवला. भारताकडून पहिला वनडे सामना खेळणाऱ्या चेतन सकारिया 2 आणि राहुल चाहरने 2 विकेट घेतल्या. कृष्णाप्पा गोथम आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

Avishka Fernando
SLvsIND : सूर्यासमोर श्रीलंकन बॉलरचा पोपट; व्हिडिओ एकदा पाहाच!

पहिल्यांदा बॅटिंग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. 13 धावा करुन शिखर धवन माघारी परतला. मनिष पांडेला संघाच्या धावसंख्येत केवळ 11 धावांची भर घालता आली. पृथ्वी शॉ 49(49), संजू सॅमसन 46(46) आणि सूर्यकुमार यादव 40(37) तिघांशिवाय कोणालाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. विशेष म्हणजे एकाही भारतीयला अर्धशतकी खेळी देखील करता आली नाही. श्रीलंकेकडून धनंजया आणि जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. चमीराला 2, करुनारत्ने 1 आणि शनाकाने 1 विकेट घेतली.

Avishka Fernando
Olympics : कधी महिला खेळाडूंची बिकीनी तर कधी शॉर्टवरुन रंगते चर्चा

धवनची विक्रमाची संधी हुकली

शिखर धवनला टीम इंडियाचे पहिल्यांदाच नेतृत्व करताना प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप करण्याचा विक्रम नोंदवण्याची संधी होती. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सौरव गांगुली आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यापैकी कोणालाच अशी संधी निर्माण झाली नव्हती. धवनला कॅप्टन्सीचा हा खास विक्रम करण्याची संधी होती. पण त्याची ही संधी हुकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.