भारताचा उसेन बोल्ट श्रीनिवासाने नाकारली क्रीडामंत्र्यांची 'ती' ऑफर

Srinivasa Gowda declines Sports Minister Kiren Rijijus Invite for test for SAI
Srinivasa Gowda declines Sports Minister Kiren Rijijus Invite for test for SAI
Updated on

नवी दिल्ली : उसेन बोल्टपेक्षा वेगवान असल्याचा दावा होत असलेल्या "कम्बाला जॉकी' श्रीनिवासा गौडाची बंगळूर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात ऍथलेटिक्‍स मार्गदर्शकांच्या उपस्थितीत चाचणी होणार होती. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या सूचनेनुसार ही चाचणी तातडीने करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या चाचणीला श्रीनिवासा गौडाने नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

श्रीनिवासा गौडाशी आम्ही संपर्क साधला आहे. त्याच्यासाठी रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यात आले आहे. त्याला ते देण्यातही आले आहे. त्याची बंगळूर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सोमवारी चाचणी होईल, असे क्रीडा प्राधिकरणाने जाहीर केले होते. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार गौडाला या चाचणीमध्ये काहीच रस नसून त्याला फक्त कम्बाला शर्यतीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. 

''कम्बाला शर्यतीमध्ये टाचेचा खूप उपयोग करावा लागतो तर याउलट ट्रॅकवरच्या शर्यतीमध्ये पंजांवर जोर द्यावा लागतो. कम्बाला शर्यतामध्ये माणासासोबतच म्हशींचाही तेवढाच वाटा असतो,'' असे त्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

मी चाचाणीमध्ये धावेल की नाही मला माहीत नाही पण मी आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मी बंगळूरला जाणार आहे. मला माझ्या कम्बाला शर्यतीच्या गुरुंनासुद्धा याबद्दल विचारावे लागेल. 

म्हशींसह धावण्याच्या कम्बाला शर्यतीत श्रीनिवासा गौडाने उसेन बोल्टच्या शंभर मीटरच्या विश्‍वविक्रमापेक्षा सरस वेळ दिली. म्हशींना वेगाने धावविणे हे कम्बाला जॉकीचे काम असते, पण त्याचवेळी म्हशींमुळेही स्पर्धकाचा वेग वाढतो, असेही काहींचे मत आहे. अर्थात या चाचणीनंतर सर्व काही स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.