मसूर (सातारा) : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ४७ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी (Kho-Kho competition) सातारा जिल्हा अमॅच्युअर खो-खो असोसिएशनची (Satara Amateur Kho-Kho Association) निवड चाचणी कवठे (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (Zilla Parishad Primary School) मैदानावर झाली. खो-खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे, राज्य क्रीडा प्रशिक्षक मनोहर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रशिक्षक प्रदीप बंडगर, प्रशांत कदम, अनिकेत मोरे, मयुर साबळे, शशिकांत गाढवे, ज्ञानेश्वर जांभळे, दिलीप माने यांच्या उपस्थितीत निवड चाचणी झाली.
खो-खो स्पर्धेसाठी निवड चाचणी कवठे (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर झाली.
त्यामध्ये निवडण्यात आलेला संघ असा : निखील विचारे-कर्णधार (मुधोजी हायस्कूल फलटण), गणेश रजपूत (दादासाहेब चव्हाण कॉलेज माळवाडी), संग्राम कांबिरे ( वाय. सी. कॉलेज कऱ्हाड), जयराज कचरे (आयटीआय कऱ्हाड), हरिओम शेलार, वरूण गाढवे (शिवप्रतिष्ठान खंडाळा), केदार माने, ओंकार मासाळ (ओगलेवाडी स्पोर्ट्स क्लब) विजय चव्हाण (संघर्ष क्लब कवठे), प्रतीक जगताप, साहिल गुजर, अथर्व भासल ( स्वराज्य सोनवडी-गजवडी), राखीव खेळाडू आदित्य साळुंखे (संघर्ष क्लब कवठे), संस्कार थोरात (संतोष जाधव क्रीडा मंडळ खराडे) तन्मय शिंदे (ओगलेडेवाडी स्पोर्ट्स क्लब) तर संघ व्यवस्थापक प्रथमेश जाधव, प्रशिक्षक ओमकार कदम यांची निवड करण्यात आली.
गोल्डन पवार, उपसरपंच गणेश घार्गे, खराडे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, सुनील जाधव, संजय जाधव, किरण जाधव, कासम पटेल, विनोद रसाळ, प्रवीण कांबिरे उपस्थित होते. गणेश घार्गे, दादासाहेब साळुंखे, सुभाष साळुंखे, नारायण जाधव, प्रकाश चव्हाण, सतीश कळसकर, शशिकांत चव्हाण, ऋषिकेश यादव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप बंडगर यांनी आभार मानले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिक्षण, क्रीडा सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.